शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

प्रजा दारात आल्याने राजा उदार

By admin | Updated: June 11, 2017 03:53 IST

लालटोपीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष

- लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : लालटोपीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी थेट आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बंगल्यावर ‘हंडा’ मोर्चा नेला. त्यानंतर आयुक्तांनी लगेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मोर्चाचा परिणाम होऊन लालटोपीनगरात काही वेळातच पाण्याचा टँकर दाखल झाला. पवना धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने २ मेपासून महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे धोरण अवलंबले आहे. शहराच्या विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये तिसऱ्या, चौथ्या मजल्यापर्यंत पाणी जात नाही. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पिंपरी, मोरवाडी येथील लालटोपीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी लालटोपीनगरमधील महिलांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडीतील अविष्कार बंगल्यावर हंडा मोर्चा नेला.हंडा, बादल्या, कळशी घेऊन महिला बंगल्यावर पोहोचल्या. त्यांनी आयुक्तांपुढे पाणी समस्येचे गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तातडीने उपाययोजना करून लालटोपीनगरवासीयांची पाणी समस्या दूर करा, असे आयुक्तांचे आदेश मिळताच, प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली झाल्या. मोर्चातील महिला आयुक्तांना भेटून पुन्हा घरी पोहोचेपर्यंत त्या भागात चक्क पाण्याचा टँकर दाखल झाला. महिलांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मात्र मॉन्सून अद्याप दाखल न झाल्याने पाणी कपात कायम राहिली आहे. आयुक्तांच्या निवासस्थानी मोर्चा नेताच, तातडीने लालटोपीनगरच्या रहिवाशांसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याचा टँकर पाठविला. आंदोलन केल्यानंतर प्रश्न सुटतो, महापालिका काहीतरी तोडगा काढते, याचा प्रत्यय लालटोपीनगरच्या रहिवाशांच्या आंदोलनामुळे आला आहे. त्यामुळे आंदोलन केल्यास प्रश्न सुटेल, असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान शहर परिसरामध्ये व्हॉल्वमधून मोठ्याप्रमाणात पाणी गळती होत आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाण्याचा अपव्यय टाळला तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होईल. तसेच अनेक ठिकाणी बांधकामालाही पिण्याचे पाणी वापरले जात आहे. या काळात बांधकाम परवाना देण्याचे थांबवले तरी पाण्याची बचत होईल. एकीकडे नागरिकांच्या घशाला कोरड पडत असतानाही पाण्याचा मोठ्याप्रमाणात अपव्यय होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सोसायट्यांना भुर्दंड : पाणी विकत घेण्याची वेळमहापालिका प्रशासनाने शहरवासीयांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला २५ टक्के पाणी कपातीचे धोरण ठरले. नंतर मात्र नागरिकांची आरेड होऊ लागताच, निर्णय बदलण्यात आला. पाणी कपात दहा टक्यावर आणली. तसेच पाऊस सुरू होताच, पाणी कपात रद्द करून पूर्ववत पाणीपुरवठा केला जाईल, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने स्पष्ट केली. तसेच अनेक सदनिकांमध्ये वरच्या मजल्यावर पाणी येत नाही. त्यामुळे बहुतांशी सोसायटींमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी कपात रद्द करावी अशी मागणी होत आहे. परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवले जाते. पण हे टँकर नेमके कुठे भरले जातात? याचे गुढ कायम आहे.