शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज-उद्धव यांच्या मोर्चामिलनाचा पुण्यातही उत्साह; बैठकांना सुरूवात, शिलेदारांवर सोपवल्या जबाबदाऱ्या

By राजू इनामदार | Updated: June 28, 2025 16:13 IST

मुंबईतील मोर्चा हा पक्षीय मोर्चा नसून मराठी भाषेवर प्रेम असणारे कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होऊ शकतात

पुणे: हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्या वतीने मुंबईत ५ जुलैला मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चामिलनाचा उत्साह पुण्यातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही संचारला आहे. मनसेच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी पक्षकार्यालयात झाली, तर शिवसेनेने रविवारी (दि.२९) लाल महालाजवळ दुपारी ३ वाजता आंदोलन जाहीर केले आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी शिलेदारांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

मनसेचे संपर्क नेते बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या कोअर कमिटीची शुक्रवारी दुपारी पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली. अशाच बैठका पिंपरी-चिंचवड, खेड, जुन्नर व अन्य तालुके तसेच पश्चिम महाराष्ट्रातही घेण्यात येणार आहेत, अशी माहिती वागसकर यांनी दिली. युवक-युवतींना यात मोठ्या प्रमाणावर आवाहन करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांबरोबरच सार्वजनिक मंडळे, संस्था, संघटनांमधील कार्यकर्त्यांसमवेत बैठका घेण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. पुण्यातून व जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने मराठीप्रेमी मुंबईत मोर्चासाठी येतील, असा विश्वास वागसकर यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही यात सामावून घेतले जाणार आहे. त्यासाठी त्यांच्याबरोबर प्राथमिक बोलणी झाली आहेत असे त्यांनी सांगितले.

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्याशिवाय जनजागृतीसाठी म्हणून त्यांनी रविवारी दुपारी ३ वाजता लाल महालाजवळ आंदोलनाचेही आयोजन केले आहे. शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले की, नागरिकांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राबद्दल, मराठी भाषेबद्दल कायमच आकस राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन हिंदी भाषिकांची मते मिळवण्यासाठी हा डाव टाकण्यात आला आहे. मराठी माणसांनी यापूर्वी अशा अनेक आक्रमणांचा यशस्वी प्रतिकार केला असून, ती परतवून लावली आहेत. त्यामुळे काहीही झाले तरी इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची केली जाणारी ही सक्ती आम्ही अमलात आणूच देणार नाही. मनसेचे स्थानिक पदाधिकारीही आमच्याबरोबर असतील, त्यांच्याशी बोलणी सुरू झाली आहेत, अशी माहिती मोरे यांनी दिली.

मुंबईतील मोर्चा हा पक्षीय मोर्चा नाही. त्यामुळे मराठी भाषेवर प्रेम असणारे कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होऊ शकतात. मराठी माणसांचे म्हणणे काय आहे ते सरकारला समजावून देणे हा या मोर्चाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या मोर्चात सक्रिय व्हावे असे आमचे आवाहन आहे. - बाबू वागसकर, मनसे संपर्क प्रमुख, संजय मोरे, शहरप्रमुख शिवसेना

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणMNSमनसेShiv Senaशिवसेना