शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 06:43 IST

तीस वर्षे महापालिकेवर सत्ता असताना उद्धवजी यांनी काहीच केले नाही. मुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी त्यांनी काही केले नाही. मराठी भाषकांच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी मराठी माणूस त्यांच्या मागे जाणार नाही, असे मत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शनिवारी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

तीस वर्षे महापालिकेवर सत्ता असताना उद्धवजी यांनी काहीच केले नाही. मुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी त्यांनी काही केले नाही. मराठी भाषकांच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही. आता तरुण मतदार भावनिक होत नाही, तो प्रॅक्टिकल विचार करतो, असे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले होते की, ते काँग्रेससोबत कधीही जाणार नाहीत. पण, काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय उद्धवजींना महागात पडला, असेही कदम म्हणाले.

पुण्यात जे. डब्ल्यू. मेरिएट येथे प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘इंट्रिया’ या हिऱ्याच्या प्रदर्शनाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्निक भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या पत्नी श्रेया कदमही या चर्चेत सहभागी झाल्या. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन्ही राज्यमंत्र्यांसोबत उत्तम समन्वय आहे, असे सांगत कदम यांनी नव्या योजनांची माहिती दिली. त्याच वेळी, ‘खरी शिवसेना आमचीच आहे,’ असे सांगत उद्धव ठाकरेंवर टीकाही केली.शिवसेना एकच !शिवसेना दुभंगली असे म्हणणे चुकीचे आहे. पक्षाचे नाव व चिन्ह आमच्याकडे आहे. जनतेने शिवसेना म्हणून आमच्यावर विश्वास ठेवला. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली, ती शिवसैनिकांना मान्य नव्हती. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी असा निर्णय कधीच घेतला नसता.

English
हिंदी सारांश
Web Title : Raj-Uddhav alliance won't matter: Minister Yogesh Kadam's strong statement.

Web Summary : Minister Yogesh Kadam believes a Raj-Uddhav alliance won't sway Marathi voters. He criticized Uddhav's past performance as CM and his alliance with Congress, stating that Shiv Sainiks didn't approve of Uddhav's decision. Kadam asserts the real Shiv Sena is with them, holding the party name and symbol.
टॅग्स :Yogesh Kadamयोगेश कदमShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे