शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत, पुण्यात 3 जानेवारीला पार पडणार कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 11:21 IST

शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या तसंच त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे

ठळक मुद्देराज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखतपुण्यात 3 जानेवारी रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहेविख्यात हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे

पुणे - आपल्या रोखठोक वक्तव्य आणि स्वभावासाठी प्रसिद्द असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखती पाहण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. पण यावेळी राज ठाकरेंना वेगळ्या म्हणजेच मुलाखतकाराच्या भूमिकेत पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी त्यांच्यासमोर असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. पुण्यात 3 जानेवारी रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेणार असल्याने ही मुलाखत रंगतदार होणार यात काही प्रश्न नाही. लोकांनाही या कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिली आहे.  

शरद पवार कधीच आपली राजकीय खेळी उघड करत नाहीत. शरद पवार पुढच्या क्षणाला कोणता डाव खेळतील हे त्यांच्या सहका-यांनाही माहित नसतं असं म्हणतात. दुसरीकडे आपल्या रोखठोक स्वभावामुळे प्रसिद्ध असणारे राज ठाकरे. आपल्याला जे बोलायचं आहे ते समोरच्याला थेट आणि स्पष्ट सांगणं हा त्यांचा स्वभाव. अनेकदा कोपरखळी मारत ते आपला मुद्दा मांडतात. आता हे दोन्ही नेते समोर आल्यानंतर काय धम्माल उडेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 

शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली तसेच त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. विख्यात हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे. 

शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि 50 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीच्या पार्श्वभूमीवर याआधी अनेक मुलाखती झाल्या आहेत. मात्र या मुलाखतींमध्ये नवीन असं काहीच नव्हतं. लोकांना आवडेल किंवा त्यांच्या लक्षात राहिल अशी मुलाखत व्हावी अशी सर्वांची इच्छा होती. रामदास फुटाणे यांनी राज ठाकरेंचं नाव सुचवल्यानंतर सर्वांनी त्यावर एकमत दर्शवलं. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अखेर 3 जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. 

महत्वाची गोष्ट म्हणजे या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न फक्त राज ठाकरेंना माहित असतील. हे प्रश्न ऐनवेळी मुलाखतीदरम्यान विचारले जातील, ज्याबद्दल शरद पवारांना काहीच कल्पना नसेल. त्यामुळे शरद पवारांचा हजरजबाबीपणा पाहण्याचीही एक संधी मिळणार आहे. आता आपल्या प्रश्नांनी राज ठाकरे शरद पवारांना कैचीत पकडण्यात यशस्वी ठरतील का हे पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस