राज ठाकरे ९ जून रोजी पुणे दौऱ्यावर;मनसेच्या शहर संघटनेत फेरबदल होणार

By राजू हिंगे | Updated: June 4, 2025 18:12 IST2025-06-04T18:11:42+5:302025-06-04T18:12:18+5:30

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने तयारी सुरू केली आहे.

Raj Thackeray to visit Pune on June 9; MNS city organization to undergo reshuffle | राज ठाकरे ९ जून रोजी पुणे दौऱ्यावर;मनसेच्या शहर संघटनेत फेरबदल होणार

राज ठाकरे ९ जून रोजी पुणे दौऱ्यावर;मनसेच्या शहर संघटनेत फेरबदल होणार

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे सोमवार, दि. ९ जून रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेणार आहेत. यात शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जाणार असून, संघटनेत मोठे फेरबदल होणार आहेत.

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने मनसेने पुणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी कंबर कसली असून, राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर पक्षाच्या रणनीतीला अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे.

मनसे पुण्यातील सर्व शाखाप्रमुख बदलणार असल्याची माहिती आहे. त्यासोबतच मनसे गटप्रमुखांच्यासुद्धा नवीन निवडणुका करणार आहे. विशेष म्हणजे, शाखाप्रमुख आणि गटप्रमुख यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नवीन पद निर्माण करून नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.

Web Title: Raj Thackeray to visit Pune on June 9; MNS city organization to undergo reshuffle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.