Raj Thackeray: शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांवर राज ठाकरेंचा निशाणा, नक्कल करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 20:32 IST2022-03-09T20:04:19+5:302022-03-09T20:32:01+5:30
Raj Thackeray Live Updates: मनसेच्या वर्धापन दिनानिमित पुण्यात झालेल्या कार्यक्रमात मनसेप्रमुख यांनी बऱ्याच काळातनंतर तुफान बॅटिंग केली. यावेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यपालांवर जोरदार निशाणा साधला.

Raj Thackeray: शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांवर राज ठाकरेंचा निशाणा, नक्कल करत म्हणाले...
पुणे - मनसेच्या वर्धापन दिनानिमित पुण्यात झालेल्या कार्यक्रमात मनसेप्रमुख यांनी बऱ्याच काळातनंतर तुफान बॅटिंग केली. यावेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यपालांवर जोरदार निशाणा साधला. तुम्हाला शिवराय समजतात का? जर एखाद्या विषयातलं आपल्याला समजत नसेल तर त्यावर भाष्य कशाला करायचं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला.
राज्यपालांवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे. त्यात हे आपले राज्यपाल. एकदा मी त्यांना भेटायला गेलो तर वाटलं हे तर कुडमुडे ज्योतिषी आहेत की काय. त्यांनी शिवरायांबाबत एक विधान केलं. पण आपल्याला ज्या विषयातील माहिती नाही, त्या विषयावर बोलायचं कशाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण कधी रामदास स्वामींचे शिष्य असल्याचं सांगितलं नाही. ना रामदास स्वामींनी आपण शिवरायांचा गुरू असल्याचा दावा केलाय. पण रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जेवढं चांगलं लिहिलंय, तेवढं कुणीही लिहिलेलं नाही. निश्चयाचा महामेरू... हे सुभाषित आज पुन्हा वाचा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.
यावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अवमान करण्यावरूनही राज ठाकरेंनी राज्यपालांवर निशाणा साधला. इतक्या छोट्या वयात लग्न व्हायची, हे मला माहितच नव्हतं, असे राज्यपाल म्हणाले, पण त्याकाळात लहानपणी लग्न व्हायची. बालविवाह व्हायचे. पण तुमचे अजून झाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.