शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट बसस्थानक प्रवेशद्वारावरच पावसाच्या पाण्याचे तळे; खड्डे अन् पाणी, ये-जा करताना प्रवाशांना त्रास

By अजित घस्ते | Updated: May 21, 2024 18:44 IST

दोन दिवसांपासून पाणी जैसे थे असल्याने खड्ड्यामुळे बसला ये-जा करताना अडथळा निर्माण होतोय

पुणे : स्वारगेट बसस्थानकातून गाडी बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वारावरच पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. बसस्थानकातील वाहतुकीच्या रस्त्यात पावसामुळे खड्डे पडून पाणी मोठ्या प्रमाणात साचले असल्याने तळयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दोन दिवसांपासून पाणी जैसे थे असल्याने खड्ड्यामुळे बसला ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. तर प्रवाशांना येणे -जाणे अवघड झाले आहे.

स्वारगेट बसस्थानकावरून गाड्या बाहेर पडणा-या गेटमध्येच पाणी साचल्याने खड्डा तयार झालाय. जेटकींन मशिनद्वारे पाणी काढण्याचे काम सुरू आहे. अद्याप पाणी बाहेर गेले नसल्याने दोन दिवसांपासून प्रवाशी हैराण झाले आहेत. याबाबत पुणे विभागीय नियंत्रक प्रमोद नेहूर यांनी येथील पाणी काढण्यासाठी मनपा क्षेत्रिय कार्यालय येथे निवेदन दिले असून मनपा प्रशासनाकडून काम होत नसल्याचे सांगितले.

स्वारगेट एसटी बस स्थानक मध्यवर्ती बस स्थानक असून येथून १० हजार प्रवाशी रोजच्या रोज ये -जा करीत आहेत. त्यात सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने प्रवासांची संख्या वाढली आहे. मात्र दोन दिवसांपासून येथे पाणी साचले आहे. परंतु ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. अपघाताचा धोका ओळखून येथील चेंबरची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी.  याबाबत मनपा क्षेत्रीय कार्यालय निवेदन देण्यात आले आहे. अद्याप काम सुरू असल्याने आगारात मात्र पाणी साचल्याने प्रवाशांना वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Puneपुणेswargateस्वारगेटRainपाऊसpassengerप्रवासीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिक