शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आयटी पार्कमध्ये पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी वाहिनी;हिंजवडीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजनांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:22 IST

- यासंदर्भात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेत संबंधित कामे करण्याचे निर्देश दिले होते.

पिंपरी :हिंजवडी फेज १, २ आणि ३ येथील मेट्रो मार्गिकेलगत आणि अन्य भागातील रस्त्यांवरील पावसाळी पाण्याचा निचरा, रस्ता दुरुस्ती तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांच्या समस्यांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह (पीएमआरडीए) इतर यंत्रणेच्या माध्यमातून अपेक्षित कामे करण्यात येत आहेत. यासंदर्भात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेत संबंधित कामे करण्याचे निर्देश दिले होते.

हिंजवडीतील समस्यांबाबत दखल घेण्यात आली असून महानगर आयुक्तांच्या निर्देशानुसार कामे सुरू आहेत. पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांच्यासह पीएमआरडीएच्या इतर यंत्रणांच्या नियंत्रणात हिंजवडीतील पावसाळी पाण्याचा निचरा, रस्ता दुरुस्तीसह इतर मूलभूत नागरी समस्यांबाबत कामे करण्यात येत आहेत.यंत्रणेमार्फत सुरू असलेली कामे

- मेट्रो सवलतकार कंपनीमार्फत मेट्रो स्थानक व मेट्रो वायाडक्टदरम्यान राडारोडा उचलण्याचे काम प्रगतिपथावर.- एमआयडीसी विभागामार्फत डोहलर कंपनीसमोर आणि साई प्रोविजो इमारतीच्या ठिकाणी, मेट्रो स्थानक क्र. २ येथील वनविभागाच्या जागेलगत पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी टाकण्यात येत आहे.- एमआयडीसी विभागामार्फत मेट्रो मार्गिकेलगतच्या नाल्याच्या ठिकाणी नाले साफसफाईचे काम करण्यात येत आहेत.- प्राधिकरणाच्या विकास परवानगी विभागामार्फत विलास जावडेकर यांच्या प्रकल्पास नोटीस काढण्यात आली असून प्राधिकरणाच्या अनधिकृत विभागामार्फत स्थानक क्र. ३ या ठिकाणी जावडेकर इमारतीच्या येथे अनधिकृत रॅम्प बांधकाम तोडण्यात येत आहे. हिंजवडी फेज - २ येथील पांडवनगर क्षेत्राच्या ठिकाणी राडारोड्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.- एमआयडीसी, प्राधिकरण आणि टाटा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या समवेत पथदिवे हस्तांतरणासंबंधी संयुक्त पाहणी करण्यात आली असून टाटा कंपनीस काही दुरुस्ती सूचनेच्या अनुषंगाने काम प्रगतिपथावर आहे.- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाच्या मुख्य रस्त्यावरील मेट्रो स्थानक क्रमांक एक येथील अनधिकृत स्टॉल काढण्यात आले आहेत.- मेट्रो सवलतकार कंपनीमार्फत आणि एमआयडीसीमार्फत खड्डे बुजविण्याचे काम प्रगतिपथावर.- टाटा कंपनीमार्फत स्टेशनच्या ठिकाणी दिशादर्शक व योग्य ते माहितीफलक लावण्यात आले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसhinjawadiहिंजवडी