शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने बळीराजाला झोपवलं; राज्यात तब्बल ६५ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 21:08 IST

काढणीला आलेलं सोन्यासारखं पीक अवकाळी पावसाने झोपवलं..

राजू इनामदार- 

पुणे: राज्यातील १८ जिल्ह्यांमधील ८० तालुक्यांमधील ६५ हजार हेक्टरवरील शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला. कृषी व महसूल विभागाचा हा प्राथमिक अहवाल आहे. रब्बीच्या हंगामातील पिके काढणीला आली असतानाच हा अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी पिके काढून उघड्यावरच ठेवली होती. अचानक झालेल्या पावसात ती भिजली व खराब झाली. एकूण ६५ हजार हेक्टर क्षेत्र पावसाने झोडपले. तर पुणे जिल्ह्यात या अवकाळी पावसाने ७३ हेक्टरचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

त्यात पुणे, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, जळगाव, नाशिक, जालना, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. गहू, बाजरी, कांदा,मका तसेच भाजीपालाही या पावसात सापडला.महसूल व कृषी विभागाच्या वतीने नुकसान झालेल्या ठिकाणांचे रितसर पंचनामे करण्यात येत आहेत. ३३टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्याला सरकारच्या वतीने २ हेक्टरची नुकसान भरपाई देण्यात येते.

पुणे जिल्ह्यातील एकाच दिवसाच्या शनिवारी दि.(२० मार्च) अवकाळी पावसाने जिल्ह्यातील २ तालुक्यातील ७ गावांमधल्या १०७ शेतकर्यांंचे ७३ हेक्टरवरील पिकाचे नुकसान केले. रब्बी हंगामातील काढणीला आलेले व काढलेले कांदा पिक या पावसात भिजून खराब झाले. उन्हाळी खरबूज पिकही पावसाच्या तडाख्यात सापडले.

खेड व शिरूर या दोन तालुक्यातील ७ गावांंना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. खेडमधील ४४ व शिरूरमधील ६३ असे १०७ शेतकरी बाधीत झाले. त्यांचे हाती आलेले कांदा, गहू, बाजरी, टोमॅटो हे पीक ऐन वेळच्या पावसाने खराब झाले.

शिरूर तालुक्यातील २ गावांमध्ये ४५ हेक्टरवरचा कांदा खराब झाला. खेडमधील ५ गावांमध्ये हा जोराचा पाऊस झाला. ५ हेक्टरवरील गहू नष्ट झाला. बाजरी, मका, टोमँटो या पिकाचेही असेच नुकसान झाले आहे. सातही गावांमधील अडीच हेक्टरवरील भाजीपालाही पावसात सापडला. शिरूरमधील १३ हेक्टरवरील आंब्यांच्या कैऱ्या पावसाने थेट जमिनीवर आणल्या. ऊन्हाळी खरबूजाचे पीक काहीजण आवर्जून घेतात. तेही पावसाने झोपवले.कृषी खात्याचा हा प्राथमिक अंदाज आहे.

महसूल तसेच कृषी खात्याने संयुक्त पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर सरकारकडून २ हेक्टरची नुकसान भरपाई मिळते. प्राथमिक पाहणीतील हे नुकसान असले तरी अंतिम पाहणीनंतर त्यात फरक पडू शकतो अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसcollectorजिल्हाधिकारीState Governmentराज्य सरकार