शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

सासवड, जुन्नर, शिरूर परिसरात पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 20:17 IST

शनिवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी ढग दाटून आले. तर काही ठिकाणी वादळ निर्माण झाले. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात हा बदल सुरू होता. आकाशात ढगांनी गर्दी केल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली

ठळक मुद्देअंतिम टप्प्यात आलेल्या पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता

पुणे  : पुरंदर, खेड, शिरूर व जुन्नर तालुक्यात शनिवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. सासवड शहरात १0 ते १५ मिनिटे पाऊस झाला. येथे काही वेळ गारांचा वर्षावही झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे पाऊस आल्याने सासवडसह काही ठिकाणी वीज गेली होती. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता असून,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजेच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार शनिवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी ढग दाटून आले. तर काही ठिकाणी वादळ निर्माण झाले. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात हा बदल सुरू होता. आकाशात ढगांनी गर्दी केल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली. सायंकाळी जोरदार वारे वाहू लागले, त्यामुळे शेतामध्ये मळणीसाठी काढून ठेवलेला हरभरा, गहू झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. वाऱ्याचा प्रवाह एवढा जोरात होता की हवेत मोठ्या प्रमाणात धूळ मिसळली गेली. काढणीला आलेल्या गहू, हरभरा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, तर काही ठिकाणी या पिकांना फटका बसला आहे. सायंकाळी उत्तरेकडून आलेल्या काळेकुट्ट ढगांनी या उष्णतेचे थंडाव्यात रूपांतर केले. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही झाल्या. जुन्नर तालुक्यात उदापूर, डिंगोरे, ओतूर परिसरात चांगलाच पाऊस झाला. विशेष म्हणजे उत्तरेकडील वाऱ्याचा वेग जास्त असल्याने उन्हाळी हंगामातील बाजरी पीक जमिनीवर कोसळले. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरPurandarपुरंदरJunnarजुन्नरRainपाऊस