मुंबईकरांना मिळणार मोबाईलवर रियल टाईम पावसाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 04:26 PM2018-04-19T16:26:42+5:302018-04-19T16:26:42+5:30

मुंबईत पावसाळ्यात पाणी साचून लाखो मुंबईकर अडकून पडतात़. त्यांना नेमके कोठे किती पाऊस पडत आहे, याचा काय परिणाम होईल याची माहिती मिळत नाही़. अशावेळी काय करावे हे त्यांना ठरविता येत नाही़.

Rainfall Real Time information will be available on Mumbaikars mobile | मुंबईकरांना मिळणार मोबाईलवर रियल टाईम पावसाची माहिती

मुंबईकरांना मिळणार मोबाईलवर रियल टाईम पावसाची माहिती

ठळक मुद्देदर अर्ध्या तासाने कोठे किती पाऊस पडत आहे याचा स्पेशल मॅप माहिती लोकांना त्यांच्या मोबाईलवर मिळू शकणार

पुणे : येत्या पावसाळ्यात मुंबईतील कोणत्या भागात किती पाऊस पडत आहे, याची रियल टाईम माहिती मुंबईकरांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे़. त्यावरुन पावसाळ्यात त्यांना कोठे पाणी साचण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन घरातून बाहेर पडायचे की नाही, हे ठरविणे शक्य होणार आहे़. 
मुंबई महापालिका आणि हवामान विभागामार्फत एकत्रितपणे ही माहिती उपलब्ध करुन देणार आहे़.अर्थ सायन्स मंत्रालयाचे सचिव डॉ़ माधवन नायर राजीवन यांनी याबाबत माहिती दिली़.
मुंबईत पावसाळ्यात पाणी साचून लाखो मुंबईकर अडकून पडतात़. त्यांना नेमके कोठे किती पाऊस पडत आहे, याचा काय परिणाम होईल याची माहिती मिळत नाही़.त्यामुळे अशावेळी काय करावे हे त्यांना ठरविता येत नाही़. हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रुझ येथे वेधशाळा आहे़. याशिवाय मुंबई महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी अ‍ॅटोमॅटिक रेनगेज नेटवर्क उभारले आहे़. त्यांच्याकडून मिळणारा डाटा व हवामान विभागाकडील डाटा एकत्रित करुन दर अर्ध्या तासाने कोठे किती पाऊस पडत आहे, याचा स्पेशल मॅप तयार केला जात आहे़. त्यावर सध्या काम सुरु आहे़. ही माहिती लोकांना त्यांच्या मोबाईलवर मिळू शकणार आहे़. त्यावरुन लोकांना पुढील निर्णय घेणे सोयीचे होणार आहे़. 

Web Title: Rainfall Real Time information will be available on Mumbaikars mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.