शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वरुणराजाची 'कृपादृष्टी' : पुणे शहरात पावसाने ओलांडली वर्षाची सरासरी ; आतापर्यंत ७४३ मिमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 00:21 IST

पुणे शहरात पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरी ५६० मिमी पावसाची नोंद होते.

ठळक मुद्देयंदा १ जूनपासून आजअखेरपर्यंत ७४३ मिमी पावसाची झाली नोंद गेल्या वर्षीही शहरात वर्षभरात ११०० मिमीहून झाला होता अधिक पाऊस

पुणे : जूनपासून सातत्याने पडलेल्या पावसाने यंदा परिसरातील सर्व धरणे भरली असून पावसाळ्याच्या चार महिन्यांनी ११ दिवस बाकी असतानाच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. पुणे शहरात पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरी ५६० मिमी पावसाची नोंद होते. तर वर्षभरात साधारण ७४० मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र १ जूनपासून आजअखेरपर्यंत ७४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जून महिन्यात सुरुवातीपासून शहरात चांगल्या पावसाला सुरुवात झाली होती. जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. त्याचवेळी ऑगस्टमध्ये संपूर्ण महिन्याभर अधूनमधून जोरदार पाऊस होत होता. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात तब्बल २४६.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. १९ सप्टेंबरला सकाळपर्यंत पुणे शहरात ७२९.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. ती आजपर्यंतच्या सरासरी पावसापेक्षा तब्बल २३२.४ मिमीने अधिक आहे. शनिवारी दिवसभरात १४ मिमी पावसाची नोंद झाली असून शहरात १ जूनपासून आतापर्यंत ७४३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचवेळी लोहगाव येथे ७४५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ती सरासरीपेक्षा ३२८.५ मिमीने अधिक आहे. आज दिवसभरात लोहगाव येथे २९ मिमी पावसाची नोंद झाली असून तेथे ७४४.२ मिमी इतका पाऊस झाला आहे.गेल्या वर्षीही शहरात वर्षभरात ११०० मिमीहून अधिक पाऊस झाला होता. पुढील काही दिवस शहरात हलक्या ते स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अजून परतीचा पाऊस सुरु झालेले नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील पाऊस हजाराचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.़़़़़़़़़

महिना        पडलेला पाऊस (मिमी)    एकूण पाऊस (मिमी)जून                     २२०                                   २२०जुलै                     १३०.३                              ३५०.३आॅगस्ट            २४६.६                                ५९६.९१९ सप्टेंबर          १४६.६                               ७४३.५

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान