शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सक्रिय, भोर, वेल्हे, मुळशी, मावळमध्ये दमदार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 01:20 IST

गेले काही दिवस दडी मारलेला पाऊस दोन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सक्रिय झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १४४.९, तर सरासरी ११.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली .

पुणे - गेले काही दिवस दडी मारलेला पाऊस दोन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सक्रिय झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १४४.९, तर सरासरी ११.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून मुळशी, भोर, वेल्हे व मावळ या तालुक्यांत दमदार हजेरी लावली.जिल्ह्यात सामेवारी सकाळपर्यंत ६०६.६ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. हंगामाच्या टक्केवारीत तो ७१.१ टक्के इतका असून ३ महिन्यांत सरसरी ९६.९ टक्के इतका आहे. आतापर्यंत पावसाचे प्रमाण चांगले असले, तरी जिल्ह्याच्या अवर्षणग्रस्त भागाकडे मात्र त्याने पाठ फिरवली आहे. बारामती, इंदापूर, दौैंड, शिरूर व पुरंदर या तालुक्यांत मात्र पाऊस नसल्याने पाणी व चारा यांची टंचाई निर्माण झाली आहे.दरम्यान, जुलैै महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र, दोन दिवसांपासून धरणपाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणांची पाणीपातळीही झपाट्याने वाढत आहे. भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण सोमवारी ओव्हरफ्लो झाले. धरणाच्या २१ दरवाजांतून विसर्ग सुरू केला आहे.भाटघर ओव्हरफ्लो!भोर : तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरल्याने स्वयंचलित २५ दरवाजांमधून सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता १२०० क्युसेक्सने पाणी खाली सोडण्यात येत आहे, तर पावरहाऊसमधून १३२६ असे एकूण २५२६ क्युसेक्सने पाणी बाहेर पडत आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास येणाºया पाण्यामुळे नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.भाटघर धरणभागात आज ९ मिमी तर एकूण ४९० मिमी पाऊस होऊन धरण १०० टक्के भरले. धरणात २४ टी.एम.सी पाणीसाठा आहे. धरणावर नारळ फोडून पाणीपूजन करण्यात आले. आज सायंकाळी ४ वाजता भोंगा वाजवून सर्वांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर ४.१५ वाजता धरणाचा पहिला गेट सुरु करण्यात आला. त्यानंतर धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून बाहेर पडणारा पाण्याचा प्रवाह वाढत गेला. एकूण ४५ दरवाजांपैकी २५ दरवाजांमधून १२०० क्युसेक्सने पाणी बाहेर पडत आहे.भाटघर धरणाला ४५ स्वयंचलित आणि ३६ रोलिंगचे असे एकूण ८१ दरवाजे आहेत. यातून प्रतिसेकंदाला ५६ हजार ७०० क्युसेक्सने एकाच वेळी पाणी बाहेर पडते. भाटघर धरण गेल्या वर्षी ३० आॅगस्टला १०० टक्केच भरले होते. मात्र या वेळी १७ दिवस लवकर भरले आहे, असे शाखा अभियंता नलावडे यांनी सांगितले.मुळशी धरण शंभर टक्के भरलेपौड : गेले महिनाभर झालेल्या दमदार पावसामुळे मुळशी धरण (दि. १२) पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या होत असलेल्या संततधार पावसामुळे (दि. १३) सकाळपासून या धरणातून २००० क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात येत असल्याची माहिती टाटा कंपनीने तहसील कार्यालयाला दिलेल्या पत्राद्वारे दिली. धरण भरल्याने मुळा नदी परिसरातील शेतकरी व मुळशी प्राधिकरण योजनेचा लाभ घेणाºया गावाच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. या भागात पावसाचा जोर कायम असून, हा विसर्ग हळूहळू वाढवून ४ हजार ४०० क्युसेक्सपर्यंत करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार सचिन डोंगरे यांनी दिली आहे. यामुळे मुळा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होणार असून, नदी परिसरातील नागरिकांनी दक्षता घेण्याचा इशारा देण्यात आला. 

टॅग्स :DamधरणRainपाऊसPuneपुणे