शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बारामती, इंदापूर तालुक्यात अवकाळी पाऊस

By admin | Updated: May 6, 2015 05:47 IST

बारामती, इंदापूर तालुक्यात आज दुपारीनंतर वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील उभ्या पिकांची हानी झाली.

बारामती : बारामती, इंदापूर तालुक्यात आज दुपारीनंतर वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील उभ्या पिकांची हानी झाली. मोठ्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. अवकाळी पावसाने उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, बाजरी पिकासह अन्य पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. बारामती तालुक्यातील पिंपळी गावच्या परिसरात गारपीटीने देखील झोडपले. गारांचा खच ठिकठिकाणी पडलेला दिसून आला. बारामती शहरात दुपारी ३ वाजल्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. सायंकाळी पाऊस पडेल, अशी स्थिती होती. वादळाबरोबर तुरळक पावसाच्या सरी सायंकाळी पडल्या. तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. (वार्ताहर)कळंब परिसरात अर्धातास पाऊसच्कळंब : कळंब (ता. इंदापूर) येथे आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जोरदार वादळी वारा वाहू लागला. तसेच, आभाळ भरून आले. सतत अर्धा ते पाऊन तास तुरळक पाऊसाच्या सरी पडू लागल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. गेली काही दिवसांपासून कडक उन्हामुळे व वातावरणातील उकाड्यामुळे कळंब परिसरातील नागरिक हैराण झाले होते. परिणामी काही नागरिक कडक उन्हात घरात बसून राहणे पसंत करत होते. तर युवक वर्ग विहिरीत डुंबण्याचा व पोहण्याचा आनंद उपभोगत होते. आज अचानक पडलेल्या तुरळक पावसाने वातावरणातील उकाडा कमी होऊन काहीसा गारवा निर्माण झाला.झारगडवाडी परिसरात पिकांचे नुकसानच्डोर्लेवाडी : झारगडवाडी (ता. बारामती ) व परिसरात मंगळवारी (दि. ५) अवकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची उन्हाळी बाजरी पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या टू व्हीलर चालवणाऱ्या वाहन चालकांना अचानक आलेल्या वादळी वाऱ्याचा फटका बसला. वारे एवढे जोरात होते की काही जणांच्या गाड्या रस्त्यावरून बाजूला गेल्या. काही जण गाडी थांबवून उभे राहिले. झारगडवाडी येथील अहिल्यादेवी चौकामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांद्या वादळी वाऱ्याने तुटून रस्त्यावर पडल्या. सुदैवाने कुणालाही इजा पोहचली नाही. पिंपळी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीटीने झोडपले. गारांचा खच ठिकठिकाणी पडलेला दिसून आला. च्वालचंदनगर : परिसरातील रत्नपुरी, जंक्शन, शिरसटवाडी, शेळगाव परिसरात सुरुवातीला वादळाने तडाका दिला. त्यानंतर संततधार पाऊस पडला. वाऱ्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाले. मात्र, झालेल्या नुकसानीचा अंदाज घेता आला नाही. बारामती तालुक्यातील पारवडी परिसरात देखील संततधार पावसाने हजेरी लावली. पाऊस पडण्यापूर्वी जोरदार वादळ होते. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. भोरमध्ये फळबागांचे नुकसानभोर : तालुक्यात गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावरील आंबा, अंजीर, डाळिंबाच्या व अळूच्या पानांच्या बागा व टोमॅटो, वांग्याचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .दिवसभर कडाक्याचे ऊन पडले होते. मात्र, दुपारनंतर अचानक ढग भरून आले. आणि गारांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणे-सातारा महामार्गावरील वेळू, गोगलवाडी परिसरातील अंजीर, आंबा, डाळिंबाच्या बागेतील झाडे मोडली. तसेच फळांचे नुकसान झाले. नवीन लावलेली टॉमॅटो, वांगी व अळूची पाने खराब झाली. पावसाचे पाणी शेतात साचल्याने पिकांचेही नुकसान होणार आहे, अचानक झालेल्या पावसामुळे लग्नसराईत गुंतलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. महामार्गावरील पावसाने नुकसान झालेल्या पांडुरंग किसन पांगारे, सुदाम कुंजीर, योगोश पांगारे या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी भोर पंचायत समितीचे सदस्य अमोल पांगारे यांनी केली. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे. यावेळी जग्गनाथ वाडकर, सदाशिव शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते . तालुक्याच्या पश्चिम भागातील घराबाहेर साचवलेले गवत, पेंढा व लाकडे भिजली, तर शेतातून काढलेला कांदा भिजला. उन्हाळी भुईमूग काढणाऱ्या शेतकऱ्यांची व भोरच्या बाजारातील भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. (वार्ताहर)