शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; कोकणासह सर्वत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 20:42 IST

पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २७ ते ३० एप्रिल दरम्यान वादळी वारे व मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. 

पुणे : बिहार ते दक्षिण तामिळनाडु दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम असून त्यामुळे यापुढील ४ दिवस राज्यात कोकणासह सर्वत्र वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४३.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. 

गेल्या २४ तासात सातारा येथे ५ मिमी पावसाची नोंद झाली होती. सोमवारी दिवसभरात सातारा येथे ४ मिमी पाऊस झाला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ ते ३० एप्रिल दरम्यान तसेच रायगड जिल्ह्यात २९ व ३० एप्रिल रोजी वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे.

पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २७ ते ३० एप्रिल दरम्यान वादळी वारे व मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. 

परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २७ ते ३० एप्रिल दरम्यान जोरदार वारे, वीजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात २८, २९ व ३० एप्रिल रोजी पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात २९ व ३० एप्रिलला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ....पुण्यात पावसाचा शिडकावा....शहरात सोमवारी सायंकाळी काही भागात तुरळक पाऊस झाला. प्रामुख्याने शहराच्या पश्चिम भागातील काही उपनगरांमध्ये पाऊस झाला. आज दिवसभर आकाश अंशत: ढगाळ होते. दुपारनंतर वीजांच्या कडकडाट होताना दिसत होता. त्यानंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी शिडकावा झाला तर काही ठिकाणी हलकी सर येऊन गेली. शिवणे परिसरात सुमारे अर्धा तास रिमझिम पाऊस झाला. सिंहगड रोड परिसर, कर्वेरोड, कर्वेनगर, शिवाजीनगर भागात तुरळक पाऊस झाला. शहराच्या पूर्व भागात मात्र पावसाने हुलकावणी दिली. 

पुढील चार दिवस शहरात आकाश अंशत: ढगाळ राहून सायंकाळी विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र