रेल्वेचे ठेकेदार कोणालाही नाही जुमानत

By Admin | Updated: May 9, 2014 09:10 IST2014-05-08T21:08:13+5:302014-05-09T09:10:39+5:30

पार्किंगसाठी दुप्पट पैसे वसुल करण्याच्या अनेक तक्रारी नेहमीच होत असतात़ रेल्वे प्रशासन मात्र केवळ ठेकेदारांवर कागदोपत्री दंडात्मक कारवाई करीत असल्याचे दाखविते़ .

Railway contractors do not have anyone in spite | रेल्वेचे ठेकेदार कोणालाही नाही जुमानत

रेल्वेचे ठेकेदार कोणालाही नाही जुमानत

पुणे : रेल्वे स्थानकावरुन नोकरी व अन्य कामाच्या ठिकाणी जाणार्‍यांना आपले वाहन दिवसभर पार्क करावे लागतेच़ त्यांच्याशिवाय अधूनमधून जाणार्‍यांचा कोणी किती तास गाडी लावली यावरुन ठेकेदार नेहमीच वाद घालत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे असून दुप्पट पैसे वसुल करण्याच्या अनेक तक्रारी नेहमीच होत असतात़ रेल्वे प्रशासन मात्र केवळ ठेकेदारांवर कागदोपत्री दंडात्मक कारवाई करीत असल्याचे दाखविते़ .
पुणे रेल्वे स्टेशनवर दोन ठिकाणी तसेच शिवाजीनगर येथे एक अशा तीन ठिकाणी पार्किंगचे ठेके रेल्वेने दिले आहेत़ येथील ठेकेदार हे वर्षानुवर्षे ते आहेत़ तेथे कोणतीही सुविधा नाही़ दिवसभर सर्व गाड्या उन्हा पावसात उभ्या असतात़ या पार्किंगमध्ये किती पैसे आकारावेत याचे दर रेल्वेने ठरवून दिले आहेत़ पहिल्या ६ तासाला ५ रुपये घेण्याचे बंधन आहे़ मात्र, अनेकदा तेथे काम करणारी मुले ६ तासापेक्षा अधिक वेळ झाला असे सांगून दुप्पट पैसे वसुल करतात़ पण पावती देताना मात्र पहिल्या टप्प्याचीच देतात़ यावरुन ठेकेदारांची मुले प्रवाशांशी नेहमीच आरेरावी करीत असतात़
याबाबत रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय़ के़ सिंह यांनी सांगितले, की ठेकेदारांकडून जादा पैसे घेतल्याच्या नेहमीच तक्रारी येतात़ त्यांच्यावर वाणिज्य खात्याकडून दंडात्मक कारवाई केली जाते़ दरपत्रक लोकांना दिसेल अशा पद्धतीने लावावे, प्रवाशांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात़
़़़़़़़

Web Title: Railway contractors do not have anyone in spite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.