थेरगावला जुगार अड्ड्यावर छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 09:48 PM2021-03-25T21:48:08+5:302021-03-25T21:48:20+5:30

रम्मी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारत पोलिसांनी ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Raid on gambling den in Thergaon; Crimes registered against 13 persons | थेरगावला जुगार अड्ड्यावर छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल

थेरगावला जुगार अड्ड्यावर छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल

Next

पिंपरी : रम्मी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. जुगार खेळणाऱ्यांकडून पोलिसांनी ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने थेरगाव गावठाणात बुधवारी (दि. २४) ही कारवाई केली. 

उमेश विठ्ठल बारणे (वय ४७, रा. थेरगाव),  रामराम नामदेव जाधव (वय ५२, रा. रहाटणी), अनिल नथ्थू पवार (वय ५८, रा. थेरगाव), चंद्रकांत श्रीपती पिसाळे (वय ४६, रा. जगतापनगर, थेरगाव), गोविंद दत्तूबा गुजर (वय ५३, रा. थेरगाव), अरुण सीताराम बारणे (वय ५५, रा. थेरगाव), विजय दासा झेंडे (वय ४३, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव), विकास बिभीषण जगताप (वय ३९, रा. कैलासनगर, थेरगाव), सुनील जिजाबा बारणे (वय ५६, रा. बापूजी नगर, थेरगाव), सतीश भगवान गवारी (वय ४०, रा. थेरगाव), बाळासाहेब तुकाराम बणगे (वय ५५, रा. थेरगाव), मोहन मुरलीधर हेळकर (वय ३८, रा. क्षमतानगर, थेरगाव), वजीर मेहबूब सौदागर (वय ४५, रा. लक्ष्मणनगर, थेरगाव), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस कर्मचारी सुनील शिरसाट यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव गावठाण येथे मारुती मंदिरासमोर पिंपळाच्या झाडाखाली पारावर मोकळ्या जागेत काहीजण पैसे लावून रम्मी नावाचा जुगार खेळत आहेत, अशी माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून कारवाई केली. यात १३ जणांवर गुन्हा दाखल केला. ५१ हजार ८०० रुपये रोख रक्कम आणि २४० रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण ५२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला.

Web Title: Raid on gambling den in Thergaon; Crimes registered against 13 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.