शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'मविआ' उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज पुण्यात; एसएसपीएमएसच्या मैदानावर सभा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 12:20 IST

पुण्यातून रवींद्र धंगेकर, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे तर मावळातून संजोग वाघेरे हे निवडणुकीच्या रिंगणात

पुणे : पुणे, शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात ३ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. आरटीओ शेजारील एसएसपीएमएसच्या मैदानावर सांयकाळी चार वाजता ही सभा होणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी, तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे, पुण्यात रवींद्र धंगेकर, शिरूरमध्ये अमोल कोल्हे, मावळमध्ये संजोग वाघेरे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे. सभेच्या ठिकाणी एलईडी स्क्रीन, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

या सभेला महासचिव रवी चेन्नी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी ४० फूट गुणिले ३० फूट असे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून तीस ते पस्तीस हजार नागरिकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव १० ते १२ हजार आसन क्षमता कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळून व्हीव्हीआयपींना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशद्वारासह एकूण तीन प्रवेशद्वारे ठेवण्यात आले असून ४ ठिकाणी एलईडी स्क्रिन उभारण्यात आले आहेत. सभेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, बिस्कीट, रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची पथके तैनात ठेवण्यात आल्याचेही काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी