मार्केट यार्ड परिसरात टोळक्याचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:39+5:302021-02-05T05:14:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्ड येथे बुधवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीत १० ते १५ जणांच्या टोळक्याने ...

मार्केट यार्ड परिसरात टोळक्याचा राडा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्ड येथे बुधवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीत १० ते १५ जणांच्या टोळक्याने त्याच परिसरातील ३० ते ४० वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच एका किराणा मालाच्या दुकानावर व वडापाव आणि कबाब विकणाऱ्या स्टॉल वर हल्ला चढवत त्यातील रोख रक्कम लंपास केली आहे. आणि त्यानंतर मुस्तफा शेख (रा.आंबेडकरनगर झोपडपट्टी) यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
याप्रकरणी कलीम बाबू शेख (वय ४७ रा. आंबेडकरनगर) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किरण थोरात (वय २५ , रा. आंबेडकरनगर), सचिन माने (वय २२, रा. महर्षी नगर), सोमनाथ शिंदे (वय २१, रा. आंबेडकरनगर) , सागर अनिल लोखंडे (वय २२, रा. गुलटेकडी) यांना अटक केली आहे.
आंबेडकरनगर परिसरात वास्तव्यास असलेले नागरिकांनी तेथील केळी बाजार लगत रात्रीच्यावेळी आपली वाहने लावली होती. अनेक वर्षांपासून ते येथे गाड्या लावतात. दरम्यान बुधवारी रात्री पावणे दहा ते अकराच्या सुमारास १० ते १५ जणांच्या टोळक्याने परिसरात हत्यारांची गाड्याची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे रात्रभर स्थानिक नागरिक घाबरलेल्या अवस्थेत होते. रात्री उशिरा पोलीस आल्यानंतर नागरिकांना थोडा धीर आला. परिसरात रात्रीचा अंधार असून आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन हे कृत्य केले. पोलिसांना प्रथम दर्शनी ३० ते ४० वाहनाची नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
दक्षिण उपनगरात बिबवेवाडी, मार्केटयार्ड व स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करण्यासाठी गाड्याची तोडफोड करणे आता नित्याचे झालेले आहे. तोडफोड करणाऱ्यांमध्ये सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.
..........
दहशत निर्माण करण्याच्या हेतून ही तोडफोड करण्यात आली आहे. आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून, वाहनांची तोडफोड करणारे रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
- प्रमोद खडके, सहायक पोलिस निरीक्षक, मार्केट यार्ड पोलिस ठाणे