शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

Ajit Pawar: सकाळी ६ वाजता वाहनाच्या रांगा; पीक अवरला काय होत असेल? अजितदादा थेट चाकण एमआयडीसी भागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 09:53 IST

सकाळी ६ वाजता मी या रत्स्यावरून आलो, वाहनांच्या रांगा एवढ्या सकाळी दिसून आल्या आहेत. म्हणजे पीक अवर किती ट्राफिक होत असेल, उपाययोजना करा

चाकण: चाकणवाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी (दि.८) ऑगस्टला भल्या पहाटे चाकणच्या परिसरातील वाहतूक कोंडीच्या चौकांची पाहणी केली.पुढील पंधरा दिवसांत वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.  

पुणे - नाशिक आणि चाकण - तळेगाव - शिक्रापूर तसेच चाकण - आंबेठाण - वासुली फाटा या मार्गांवर वाहतूक कोंडी नित्याची असती. याच मार्गांवरून औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना येजा करावी लागते.तब्बल चार ते पाच हजार कंपन्या कार्यरत आहे. त्यात पाच लाख कर्मचारी काम करतात.त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात. त्यामुळं या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे.अजित पवार म्हणाले,  आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी पावणे सहा वाजता आलो.नॅशनल हायवे,पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे,त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केलाय,तुम्ही सहनशीलता दाखवली. पण आता यातून सुटका करुयात. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 चाकणला स्वतंत्र महानगरपालिका करावी लागणार आहे.काहींना आवडेल न आवडेल,पण हे करावं लागेल.सोबतच बारामतीची तुलना चाकण सोबत करू नका असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.  मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका आणि चाकण आणि हिंजवडी भागात ही महापालिका करावी लागणार आहे, असंही अजित पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

पोलीस आयुक्तांना अजितदादांनी खडसावलं 

एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतायेत. मग पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाहणी करत असताना चाकणच्या तळेगाव चौकात पोलिसांनी वाहनं रोखून धरली. त्यामुळं अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंना खडसावले, हे बरोबर नाही.मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केली आहे?,सगळी वाहतूक सुरु करा,असं पवार यांनी बजावल. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुक कोंडीचा आढावा घेताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अजित पवार आणि आधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटोही दाखवले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारChakanचाकणMIDCएमआयडीसीTrafficवाहतूक कोंडीcarकारbikeबाईक