शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका शाळांची गुणवत्ता ढासळतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 20:55 IST

सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना महागडे शिक्षण परवडत नाही आणि महापालिकेच्या शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळत नाही...

ठळक मुद्दे मुख्य सभेत सदस्यांनी केली चिंत्ता व्यक्त 

पुणे : महापालिकेच्या शाळा सुरु झाल्या तरी विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश मिळाले नाही, अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाही, शिक्षक वेळेवर येत नाहीत, वर्ग खोल्या, स्वच्छता गृहाची दुरवस्था झालीय, पिण्याच्या पाण्याची सोय नाही अशी या अनेक कारणांमुळे महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता ढासळतच चालली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना महागडे शिक्षण परवडत नाही आणि महापालिकेच्या शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळत नाही, मग या नागरिकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचारच करायचा नाही का, असा सवाल मुख्य सभेत प्रश्न उत्तराच्या तासामध्ये सदस्यांनी उपस्थित केला. यावर येत्या महिन्याअखेरपर्यंत सुमारे २५० हून अधिक शिक्षक नव्याने भरती होणार असून, गुणवत्ता सुधारण्यासाठी नवनवीन प्रयोग करण्यात येतील, असा खुलास महापालिकेच्या शिक्षण प्रमुख मिनाक्षी राऊत यांनी केला.    महापालिकेच्या मुख्य सभेत प्रश्न उत्तराच्या तासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रिया गदादे यांनी महापालिकेच्या शाळांची दुरवस्था व ढासळत असलेली गुणवत्ता यावर प्रश्न उपस्थित केला. सोमवार पासून महापालिकेच्या शाळा सुरु झाल्या शिक्षकासोबत लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांचे स्वागत केले. परंतु अनेक शाळांमध्ये पहिल्याच दिवशी शिक्षक उपस्थित नव्हते, महापालिकेच्या शाळांचा दर्जा घसरत असल्याने विद्यार्थी शाळा सोडून खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. पट संख्या कमी होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांचे दाखल अडविले जातात, परंतु शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याची खंत गदादे यांनी व्यक्त केली.     दरम्यान उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी देखील महापालिकेच्या शाळांबाबत, शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदामुळे चिंत्ता व्यक्त केली. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त असून, भरती कधी करणार याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. तर नगरसेविका सायली वांजळे, सचिन दोडके, राजाभाऊ लायगुडे यांनी आपल्या मतदार संघातील महापालिकेच्या शाळांचा दर्जा खूपच चांगला असून, प्रवेशासाठी पालकांना प्रतिक्षा करावी लागते. परंतु विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने वर्ग खोल्या आणि शिक्षकांची संख्या कमी पडत असून, तातडीने वाढ करण्याची मागणी केली. सायली वांजळे यांनी आपल्या प्रभागामध्ये  प्रस्तावीत रमेश वांजळे ई -लर्निंग शाळेसाठी ७ कोटी निधीची गरज असून, हा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी महापौराकडे केली.    याबाबत खुलास करत राऊत यांनी महापालिकेच्या शाळांमधून दाखला घेतल्यानंतर अनेक पालक विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी प्रवेश घेत नाहीत. यामुळे शाळाबाह्य मुलांची संख्या वढते, हे टाळण्यासाठी दाखले देण्यावर काही निर्बंध घालण्यात आले होते. परंतु दाखल्यासाठी पालकांची अडवणूक होणार नसल्याचे स्पष्ट केले. तर मराठी माध्यमासाठी ९० आणि इंग्रजी माध्यमासाठी १९० शिक्षकाची भरती प्रक्रिया सुरु असून, महिन्याअखेरपर्यंत रुजू होतील. यामुळे रिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागले, असे स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाEducationशिक्षणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका