शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलाला क्यूआर कोडची जोड

By admin | Updated: March 22, 2017 03:29 IST

महावितरणने वीजबिलाला नवा चेहरा दिला असून, सुटसुटीत माहितीसह मोबाईल अ‍ॅप थेट डाऊनलोड करण्यासाठी या बिलामध्ये क्यूआर कोड

पुणे : महावितरणने वीजबिलाला नवा चेहरा दिला असून, सुटसुटीत माहितीसह मोबाईल अ‍ॅप थेट डाऊनलोड करण्यासाठी या बिलामध्ये क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे.महावितरणचे नव्या स्वरूपातील वीजबिल वीजग्राहकांना वितरीत करण्यात येत आहे. जुन्या वीजबिलाच्या तुलनेत ते अधिक सुटसुटीत असून, त्याची रंगसंगती देखील आकर्षक करण्यात आली आहे. या बिलात असलेल्या क्यूआर कोडद्वारे वीजग्राहकांच्या सेवेसाठी असलेले महावितरणचे मोबाईल अ‍ॅॅप डाऊनलोड करता येत आहे. मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाऊनलोड केलेल्या क्यूआर कोड रीडरच्या माध्यमातून महावितरणच्या वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन केला की थेट महावितरण मोबाईल अ‍ॅपची लिंक उपलब्ध होत आहे. त्याद्वारे हे अ‍ॅप डाऊनलोड करता येणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे वीजबिलावरील क्यूआर कोड हा ‘अ‍ॅॅन्ड्राईड’, ‘विन्डोज’ व ‘आयओएस’ या आॅपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध आहे.महावितरणने विविध ग्राहकसेवा मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या अ‍ॅॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात ११ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी महावितरण मोबाईल अ‍ॅॅप डाऊनलोड केला आहे. या अ‍ॅपमधून उच्च व लघुदाब (एलटी व एचटी) नवीन वीजजोडणीची मागणी करता येणे शक्य झाले आहे. चालू व मागील देयके पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेटबँकिंग, के्रडिट-डेबिट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय असून, भरलेल्या पावतीचा तपशीलही देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)