शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत लॉकडाऊनमध्ये पोलिसाच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 20:15 IST

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसमोर बारामतीत घडली घटना

ठळक मुद्देमला सोडा अन्यथा तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटी करेन , अशी पोलिसांनाच धमकीसरकारी कामकाजात अडथळा, कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घालणे कायद्यानुसार गुन्हा दाखल

बारामती: लॉकडाऊन च्या काळात बाहेर का फिरतो अशी विचारणा करणाऱ्या एकाने थेट पोलिसांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडला. शुक्रवारी (दि 10) ही घटना घडली असून  लाला आत्माराम पाथरकर (रा. आमराई, बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी वैभव साळवे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ शहरातील भिगवण चौक येथे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह साळवे, पोलिस शिपाई कोठे, शासकीय वाहनाचे चालक गावडे, इंगोले हे येथील भिगवण चौकात सेवेवर होते. अत्यावश्यक सेवेतील लोकांना तपासत त्यांना सोडण्यात येत होते. यावेळी पाथरकर हा त्याच्या स्कुटी वरून (क्र -एमएच-४२, एके-३१०९) त्या ठिकाणी आला. यावेळी पोलिसांनी त्याला लॉकडाऊनच्या काळात बाहेर कशाला फिरता अशी विचारणा केली.त्यावर पाथरकर याने त्याची बहीण आजारी असल्याचे पोलिसांना सांगितले.याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी  शिरगावकर हे त्याला विचारणा करीत होते . चौकशी सुरू असताना पाथरकर गाडी चालू करू लागला. त्यामुळे पोलीस कर्म चारी साळवे यांनी त्याची गाडी थांबविण्याचा प्रयत्न करीत त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, पाथरकर याने   थेट अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. साहेब मी आत्महत्या करेन असे म्हणत इमारतीच्या खांबाला त्याने धडका घेत स्वत: जखमा करून घेतल्या. मला सोडा अन्यथा तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटी करेन , अशी धमकी त्याने पोलिसांनाच दिली.शिवाय एकमेकांना चिकटल्याने कोरोना व्हायरस होतो ना , असे म्हणत त्याने पोलिस कर्मचाऱ्यांना अंगाला अंग घासत सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात सरकारी कामकाजात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घालणे यासह आपत्ती व्यवस्थापन कायदा,  कोविड १९ च्या कायद्यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर