शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

पुरंदर विमानतळ आमच्या प्रेतावरूनच होईल; पुरंदरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार  

By प्रीती फुलबांधे | Updated: March 20, 2025 19:07 IST

एकदा जमिन गेली, की कोणीही शेतकऱ्यांची विचारपूस करणार नाही.यावेळी त्यांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

सासवड :पुरंदर तालुक्यात नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून आमच्या प्रेतावरूनच विमानतळ होईल अशी शपथ हजारो शेतकऱ्यांनी घेतली. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारगाव मेमाणे येथे प्रकल्पविरोधी सभा पार पडली.  ज्यात सातही बाधित गावातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.   यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी राज्यकर्त्यांवर कडाडून टीका ते म्हणाले की,हा विमानतळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी नाही, तर मोठ्या उद्योगपतींसाठी आहे. सरकार आणि पुढारी सत्य लपवून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. एकदा जमिन गेली, की कोणीही शेतकऱ्यांची विचारपूस करणार नाही.यावेळी त्यांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. नुकतेच राज्य सरकारने पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी, कुंभारवळण, वनपूरी, उदाचीवाडी या गावांसाठी भूसंपादन प्रक्रियेची माहिती जाहीर केली, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय, या सात गावांना औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करून जमिनीच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. हे या निर्णयामागील गुप्त हेतू उघड करणारे असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.  

 शेतकऱ्यांनी हा लढा कायदेशीर मार्गाने आणि अहिंसेच्या तत्वांवर लढला पाहिजे, असा सल्ला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला. पोलिसांच्या लाठ्या पडतील, रक्त सांडेल, पण जर लढा संयमाने दिला, तर विजय आपलाच असेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. या सभेत गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनाला आणखी बळ देण्यासाठी लवकरच पुढील रणनिती ठरवली जाणार आहे. असेही जाहीर करण्यात आले.मरण आलं तरीही जमिन सोडणार नाही; शेतकऱ्यांचा ठाम निर्धारपुरंदरविमानतळासाठी सात हजार एकर जमीन सरकार बळकावण्याच्या तयारीत आहे, मात्र शेतकऱ्यांनी या निर्णयाला ठाम विरोध करत प्रकल्पासाठी जमिन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जर सरकार जबरदस्तीने भूसंपादन करणार असेल, तर तो आमच्या प्रेतावरच करावा, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.   

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPurandarपुरंदरairplaneविमानAirportविमानतळ