शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकारची दडपशाही सुरूच, जमिनीच्या मोजणीला 'सात' गावांतील शेतकऱ्यांचा विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 19:15 IST

- कोणतीही चर्चा न करता जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राज्य शासन फुकटात जमीन लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

सासवड : पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्पामुळे बाधित सात गावांमध्ये भूमी अभिलेख व महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या परस्पर ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच ‘सात’ गावांतील शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोजणीला जोरदार विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारताच, अधिकारी मोजणीच्या ठिकाणाहून निघून गेले. पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी पारगाव-मेमाणे येथे विमानतळाच्या जागेच्या मोजणीसाठी वन विभागाने ड्रोनच्या माध्यमातून मोजणी सुरू केली होती. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी या मोजणीला तीव्र विरोध व्यक्त केला. यावेळी स्थानिक नागरिक, वनविभागाचे अधिकारी, सासवडचे तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

या प्रकल्पामुळे सात गावांना फटका बसणार आहे. त्यांपैकी पारगाव मेमाणे आणि उदाचीवाडी गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी विमानतळाच्या निर्मितीसाठी देण्यास विरोध केला आहे. आज पारगाव मेमाणे आणि उदाचीवाडी या दोन गावांमध्ये ड्रोनद्वारे शासकीय पद्धतीने जमिनीचे सर्वेक्षण सुरू होते. मात्र, स्थानिकांनी या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवला. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी देण्यास सहमती दर्शवली आहे, त्यांच्या जमिनीची मोजणी शासनाने करावी, याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही;पण ज्यांनी सहमती दर्शवलेली नाही, त्यांच्या जमिनी शासनाने मोजू नयेत. आमच्या शेतांमध्ये येऊ नका, अशी ठाम भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

पारगाव आणि उदाचीवाडी गावात शनिवारी सकाळी सरकारी अधिकारी मोजणीसाठी आले. स्थानिक रहिवाशांना याबाबत काहीच सांगण्यात आले नव्हते. अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने जमिनी मोजपट्टी केली. शासनाचे लोक आम्हाला म्हणत होते की, आम्ही वनविभागाची जमीन मोजत आहोत. त्यानंतर आम्ही पुरावा मागितला; परंतु त्यांना पुरावा देता आला नाही. ‘वनविभागाची जमीन मोजायची आहे तर आमच्या शेतांमध्ये दोन किलोमीटर पुढे ड्रोन का जातो?’ असा थेट प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पुरंदर तालुक्याचे तहसीलदार विक्रम रजपूत यांनी शासकीय जमिनीची मोजणी सुरू असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर शेतकऱ्यांनी ‘जर शासकीय जमिनीची मोजणी केली असेल तर तशी कागदपत्रे दाखवा,’ अशी मागणी केली. ‘आम्हाला विमानतळाची आवश्यकता नाही. आमचा या विमानतळाला विरोध आहे. आम्ही कोणतीही संमती दिलेली नसताना आमची सुजलाम् सुफलाम् जमीन शासन फुकटात घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.’

English
हिंदी सारांश
Web Title : Purandar Airport: Farmers resist land surveying, alleging government oppression continues.

Web Summary : Farmers in seven villages protested land surveying for the Purandar airport, alleging coercion. They questioned authorities about the drone survey's purpose and demanded proof of government ownership, opposing land acquisition without consent.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळMaharashtraमहाराष्ट्र