शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Purandar Airport : पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी लवकरच मोजणी आणि सर्वेक्षणही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:53 IST

भूसंपादनासाठी होणार अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुणे :पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव मेमाणे या सात गावांतील जमिनींच्या संपादनासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. यासाठी जमिनीचे सर्वेक्षण, मोजणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.पुरंदरविमानतळासाठीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १० मार्चला अधिसूचना जारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, पुण्यात सोमवारी महसूल तसेच उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा झाली.पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या कायद्यान्वये भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्यात येणार आहे. विमानतळासाठी निश्चित केलेल्या सात गावांमधील ३ हजार ३०० सर्व्हे क्रमांकामधील जमिनींचे सर्वेक्षण करा, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.संबंधित जमिनीची मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असाही निर्णय झाला आहे. सात गावांसाठी स्वतंत्र ४ भूसंपादन अधिकारी नेमावेत की एकच अधिकारी नियुक्त करण्यात येणार, याबाबत चर्चा झाली आहे; मात्र याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. येत्या आठवडाभरात याबाबत निर्णय होणार आहे.

 विमानतळासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्यात येईल. त्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करून पुढील प्रक्रियाही सुरू करण्यात येईल.  - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAirportविमानतळPurandarपुरंदर