शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीच्या जागतिक क्रमवारीने पुण्याची नाचक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:44 IST

भाजपची सत्ताच जबाबदार असल्याची आप पक्षाची टीका

पुणे : टोमटोम या संस्थेने वाहतूककोंडीच्या संदर्भात जगभरातील ५०० शहरांची पाहणी करून त्यात पुणे शहराला चौथा क्रमांक दिला. दिल्लीपासून गल्लीपर्यंत मागील काही वर्षे सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाचीच ही कर्तबगारी असल्याची टीका करून आम आदमी पार्टीच्या (आप) पुणे शाखेने त्याविरोधात शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. पुण्याची नाचक्की करून मिळेल, अशा घोषणा देत त्यांनी यांचे संयोजक भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारीच असल्याचा आरोप केला.आंदोलनात आपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या पुणे दौऱ्यात काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वाहतूककोंडीबाबत व्यक्त केलेल्या जाहीर नाराजीचाही उल्लेख केला. त्याचबरोबर थेट राष्ट्रपतींनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल भाजपच्या जबाबदार सत्ताधिकाऱ्यांनी घेतली नाही, त्यामुळेच आधीच सातवा असलेला क्रमांक आता चौथा झाला असेही आंदोलन पाहण्यासाठी जमलेल्या पुणेकरांना सांगितले. साखर संकुल चौकात सकाळी ११ वाजता झालेल्या या आंदोलनात सुबह शाम सभी रस्ते जाम ही जाम अशाही घोषणा दिल्या. महापालिका, राज्यात व दिल्लीतही गेली काही वर्षे भाजपची सत्ता आहे, मात्र त्यांनी पुणे शहरासाठी मोठमोठ्या घोषणा करण्याव्यतिरिक्त काहीही केले नाही, अशी टीका यावेळी करण्यात आली.पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याचा समावेश केला. त्यासाठी काही कोटी रुपयांचा खर्च झाला. फक्त अत्याधुनिक सिग्नल्ससाठीच काही कोटी रुपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र पुणे आहे तिथेच राहिले असे नाही तर आहे त्यापेक्षाही खाली गेले. पुणेकरांनी भाजपला सगळी राजकीय सत्ता दिली, ते मात्र भ्रष्टाचार व बेजबाबदार कारभार याशिवाय दुसरे काहीच द्यायला तयार नाहीत.सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, शंकर थोरात, सुरेखा भोसले, अक्षय शिंदे, प्रशांत कांबळे, मिलिंद ओव्हाळ, सुभाष कारंडे, शेखर ढगे, कुमार घोंगडे, संजय कटारनवरे, सैद अली, संतोष काळे, सुनील सौदी, फबीयन सॅमसन, अभिजित मोरे, अमित म्हस्के, विकास चव्हाण, शिवाजी डोलारे, कविता गायकवाड व पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रTrafficवाहतूक कोंडीAAPआपBJPभाजपाtraffic policeवाहतूक पोलीस