शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

पुणे महापालिकेच्या सोनोग्राफी मशिन्स धूळखात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 16:45 IST

महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या सोनोग्राफी मशिन्सचा वापरच होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे महापालिकेकडे संपूर्ण शहरासाठी केवळ एकच रेडिओलॉजिस्ट उपलब्ध खाजगी रुग्णालयांमध्ये एका मशीनवर एक महिन्यालाय तब्बल ७०० एवढेमहापालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन  या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नऊ महिन्याच्या कालावधीत प्रति महा प्रति मशीन केवळ २० केसेसची तपासणी

पुणे : महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या सोनोग्राफी मशिन्सचा वापरच होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या या मशिन्सवर केवळ गर्भवाढ संबंधित सोनोग्राफी केल्या जात असून, तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने अन्य कोणत्याही आजारांसाठी याचा वापर होत नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून घेतलेल्या मशिनचा योग्य वापर होत नाही, तर तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने अन्य आजारांसाठी सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णलयात जाऊन सोनोग्राफी करावी लागत आहे. यामुळे मात्र पुणेकरांना दुहेरी भुर्दंड सहन करावा लागत आहे.

        याबाबत सजग नागरिक मंचाने माहिती अधिकारामध्ये मिळविलेल्या माहिती नुसार, पुणे मनपाच्या १५ इस्पितळ व दवाखान्यांमध्ये सोनोग्राफी मशिन्स बसविण्यात आल्या आहेत. मात्र या मशिन्स चा वापर खरेदी केल्यापासूनच अत्यल्प होत आहे. यामध्ये  २०१५ - १६ मध्ये प्रत्येक मशीन वर प्रत्येक महिन्यामध्ये सरासरी २० केसेस तपासण्यात आल्या. तर २०१६ - १७ मध्ये प्रत्येक महिन्यात सरासरी ३० केसेस तपासण्यात आल्या. तर जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या नऊ महिन्याच्या कालावधीत प्रति महा प्रति मशीन केवळ २० केसेस तपासण्यात आल्या आहेत. हेच प्रमाण खाजगी रुग्णालयांमध्ये एका मशीनवर एक महिन्यालाय तब्बल ७०० एवढे असते.     याबाबत अधिक चौकशी केली असता महापालिकेकडे संपूर्ण शहरासाठी केवळ एकच रेडिओलॉजिस्ट उपलब्ध आहे. तर महापालिकेच्या रुग्णालयात असलेले स्त्रीरोग्य तज्ज्ञ केवळ गर्भवाढी संदर्भांतील तपासण्यासाठी या सोनोग्राफी मशीनचा करू शकतात. यामुळे इतर रोगांची तपासणी या मशीवर होत नाही. याबाबत सजग नागरिक मंचाचे प्रमुख विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन  या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी जनतेच्या करांच्या पैश्यांची उधळपट्टी करून अकारण मोठ्या प्रमाणात सोनोग्राफी मशिन्स खरेदी करण्यात आल्या आहेत. मशीन खरेदी करण्यासाठी पुढाकार घेणा-या आरोग्य विभागाला मशिन्सचा अत्यल्प वापर होत असल्याचे गेल्या तीन वर्षांपासून वेळोवेळी लेखी पत्र दिली आहेत. परंतु अद्यापही याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.     त्यामुळे आयुक्तांनी यामध्ये स्वत: लक्ष घालून आरोग्य खात्यास या सोनोग्राफी मशिन्स चा पुरेसा वापर करण्यासाठी भाग पाडावे व तोपर्यंत एकही नवीन सोनोग्राफी मशिन विकत घेऊ नये, अशी मागणी केली आहे.----------------पुणेकरांच्या पैशांच्या उधळपट्टी थांबवामहापालिकेने शहरातील १५ इस्पितळ व दवाखान्यांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च सोनोग्राफी मशिन्स बसविण्यात आल्या. परंतु या मशीनचा महिन्याला सरासरी दहा टक्के देखील वापर केला जात नाही. या मशिनचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या तज्ज्ञ देखील महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील आरोग्य विभागाने याकडे लक्ष दिले नाही. त्यात नव्याने मशीन खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे. पुणेकरांच्या पैशांची ही उधळपट्टी थांबवा.-विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच 

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाVivek Velankarविवेक वेलणकरSajag Nagrik Manchसजग नागरिक मंच