शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

पुण्याच्या भाजपाची ‘पाटिलकी’ आता कोल्हापूरच्या चंद्रकांतदादांकडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 3:45 PM

पुण्याचे कारभारी : ना गिरीश बापट, ना संजय काकडे; पक्षश्रेष्ठींचे मनसुबे स्पष्ट 

ठळक मुद्देअनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना त्यामुळे  ‘ब्रेक’ बसण्याची शक्यता भाजपा पक्षश्रेष्ठींचा पुण्याचे संभाव्य नेतृत्व पाटलांकडेच देण्याचा मनसुबा उघड शहराचे नेतृत्व बापटांकडे की काकडेंकडे, या चर्चांना पूर्णविराम

लक्ष्मण मोरे

पुणे : सन २०१४पासून लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि यंदा पुन्हा लोकसभा असा निवडणुकीतला विजयी चौकार मारणाऱ्या भाजपाने आता पुण्याच्या राजकारणावर चांगली मांड बसवली आहे. पुण्यातली सर्व सत्तास्थाने भूषविणाऱ्या भाजपाचे नेतृत्व कोण खासदार गिरीश बापट करणार की सहयोगी खासदार संजय काकडे, यावरून पक्षात चुरस होती. मात्र, कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपाने थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच उमेदवारी दिल्यानंतर पुणे भाजपाच्या नेतृत्वाचा प्रश्न निकाली निघणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.   दशकभरापूर्वी खासदार सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पुणे महापालिका अनेक वर्षे ताब्यात ठेवली होती. यासोबतच खासदार, आमदारही बहुसंख्येने काँग्रेसचेच होते. सध्या असेच राजकीय बळ भाजपाचेच आहे; मात्र कलमाडी यांच्यासारखे ताकदवान आणि संपूर्ण पक्षावर हुकूमत गाजवण्याची क्षमता असणारे नेतृत्व शहर भाजपाकडे नसल्याने सत्तासंघर्ष आणि प्रभागनिहाय-मतदारसंघनिहाय सुभेदारी, गटबाजी भाजपात उफाळून आली आहे.दरम्यानच्या काळात पुण्याचे पालकमंत्रिपद गिरीश बापट यांच्याकडे होते. त्यातच सहयोगी खासदार संजय काकडे यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग पालिका निवडणुकांमध्ये होता. त्यामुळे बापट व काकडे यांच्यात शहर भाजपाच्या नेतृत्वाची स्पर्धा लागली होती. यातून अनेकदा परस्परविरोधी वक्तव्ये झाली होती. ‘एसके टू एसके’ (सुरेश कलमाडी ते संजय काकडे) अशाही बातम्या पेरल्या गेल्या. लोकसभा निवडणुकीचे तिकीट देऊन बापट यांना मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या राजकारणामधून बाजूला करण्याची खेळी केल्याचे बोलले जाऊ लागले. बापट लोकसभेवर निवडून गेल्यानंतर पुण्याचे पालकमंत्रिपद महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा तात्पुरता निर्णय असल्याचे सांगत पक्षाने अंतर्गत नाराजी टाळण्याचा प्रयत्न केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आमदारांना आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी स्वप्ने पडत असतानाच पाटील यांनी  ‘सहपालकमंत्री’ म्हणून बाळा भेगडे यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यानंतर पाटील यांच्याकडे काही दिवसांनंतर प्रदेशाध्यक्षपदही आले. पाटील कोल्हापुरात कमी आणि पुण्यात जास्त दिसू लागले होते. बघता-बघता त्यांच्याभोवती पालिकेतील कारभाºयांचा आणि पदाधिकाचा राबता वाढू लागला. अनेकजण त्यांच्या गाडीमधून सोबत फिरू लागले. शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाटलांचे बोट धरण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. अनेकांना विधानसभेच्या उमेदवारीचीही अपेक्षा होती. त्यात स्वत: पाटील हेच आता कोथरूडचे उमेदवार ठरले आहेत. त्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठींचा पुण्याचे संभाव्य नेतृत्व पाटलांकडेच देण्याचा मनसुबा उघड झाला आहे. कोथरूड हा पुण्यातील सर्वांत सुरक्षित मतदारसंघ असल्याने त्याची निवड करण्यात आल्याचे बोलले जाते. परंतु, त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातील तसेच शहरातील भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. पाटील यांना उमेदवारी देऊन एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना त्यामुळे  ‘ब्रेक’ बसण्याची शक्यता आहे. शहराचे नेतृत्व बापटांकडे की काकडेंकडे, या चर्चांना पूर्णविराम देण्याचाच एकप्रकारे प्रयत्न करण्यात आला आहे.............संघ परिवाराची भूमिका महत्त्वपूर्णपाटील हे अनेक वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत होते. राष्ट्रीय सरचिटणीसपदही त्यांनी सांभाळलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील संघटनांशी असलेला तगडा संपर्क हा पाटलांच्या पथ्यावर पडणार का? कोथरूडकर पाटील यांना स्वीकारणार का? या प्रश्नांची उत्तरे निवडणूक निकालानंतरच मिळू शकणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलgirish bapatगिरीष बापटSanjay Kakdeसंजय काकडे