शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरास 10 लाखांना लुटले, CM चे सचिव अन् उपमुख्यमंत्र्यांच्या PA चे नाव घेऊन फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 22:35 IST

प्रविण विठ्ठल जगताप (वय ४९, रा. वाई, सातारा) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे येथील एका ४२ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली आहे.

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव भूषण गगराणी यांचे स्वीय सहायक व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पी ए यांच्या नावाने तब्बल १० लाख रुपये उकळल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने सातार्यातील एकाला अटक केली असून त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण विठ्ठल जगताप (वय ४९, रा. वाई, सातारा) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे येथील एका ४२ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण जगताप हा अनेक मोठमोठ्या व्यक्तींशी ओळख असल्याच्या बढाया मारत असतो. मंत्रालयातील तसेच पुणे महापालिकेतील टेंडरची कामे करुन देतो, असे सांगून तो फसवणूक करीत होता. त्याने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना पुणे महापालिकेतील ५ कोटी रुपयांचे बजेट लॉकींग करुन देतो, सांगितले. त्याने आपली ओळख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सचिव भूषण गगराणी यांचे पी ए हेमंत केसळकर तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक मुसळे यांच्याशी ओळख असल्याची बतावणी केली. तुमचे काम करून देतो असे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने फिर्यादीकडून पुणे रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये ५ लाख रुपये रोख स्वीकारले. तसेच मित्रांमार्फतीने फिर्यादीकडून आणखी ५ लाख रुपये असे १० लाख रुपये उकळले. हा प्रकार जुलै २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घडला आहे. 

दरम्यान पैसे दिल्यानंतरही आपले काम होत नसल्याने तसेच आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली. सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांनी खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांना चौकशीचा आदेश दिला. प्रविण जगताप याचा शोध घेत असता तो पुणे स्टेशन येथे आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संदीप बुवा, उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौंदर, रवींद्र फुलपगारे, हेमा ढेबे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, अमोल आवाड, विजय कांबळे, विवेक जाधव, नितीन रावळ, अमर पवार यांनी सापळा रचून त्याला अटक केली. न्यायालयाने अधिक तपासासाठी ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस