शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Aaple Sarkar: ऑनलाइन सेवा घेण्यात पुणेकर अव्वल! वर्षभरात ३४ लाख नागरिकांनी घेतला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 10:10 IST

विशेष म्हणजे सर्वाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले

श्रीकिशन काळे

पुणे : जनतेला ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा पोर्टल सुरू झाले आणि दाखले घेण्यासाठी सरकारी कार्यालयात मारावे लागणारे खेटे कमी झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. त्यातही या सेवेचा सर्वाधिक उपयोग पुणेकरांनी घेतला आहे. गतवर्षी ३४ लाख पुणेकरांनी या ऑनलाइन सेवेचा लाभ घेतला आहे.

सरकारच्यावतीने आपले सरकार या संकेतस्थळावर व मोबाइल ॲपवर ५०६ अधिसूचित सेवांपैकी ४०९ सेवा ऑनलाइन केल्या आहेत. उर्वरित ९७ सेवांसाठीची प्रणाली विकसित होत आहे. राज्यातील ३२ हजार ५४३ ‘आपले सरकार सेवा केंद्रांचा उपयोग यासाठी होत आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत ९ कोटी ७८ लाख ८१ हजार ८१२ अर्ज प्राप्त झाले असून, ९ कोटी ४० लाख ६५ हजार ७३२ अर्जांवर कार्यवाही झाली आहे. आपले सरकार वर सेवा प्राप्त करण्यासाठी अगोदर स्वतःचे प्रोफाइल तयार करावे लागते. त्यात सर्व अधिकृत कागदपत्रांचा समावेश असतो. ३१ मार्च २०२१ पर्यंत ४२ लाख ७० हजार ९७ जणांनी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करून प्रोफाइल तयार केले आहेत.

ऑनलाइन काय अन् ऑफलाइन काय?

- प्रॉपर्टी कार्ड अद्याप ऑनलाइन दिले जात नाही. त्यात पैसे खाता येत असल्याने ते ऑनलाइन केले नसावे, अशी शंका सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.- सुमारे ९७ सेवा अद्याप ऑफलाइनच दिल्या जातात. मृत्यू प्रमाणपत्रदेखील ऑनलाइन मिळत नाही. तेही ऑनलाइन देणे आवश्यक आहे.

कसा घ्यावा लाभ...

ऑनलाइन सेवा घेण्यासाठी नागरिकांना एकदाच आपले सरकार (Aaple Sarkar) वर नोंदणी करायची आहे. याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या काेराेना संकट काळात २८ लाखांवरून ४२ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. सार्वजनिक सेवांसाठी ३१ मार्च २०२१ अखेर ९ कोटी ७८ लाख ८१ हजार ८१२ अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले आहेत.

नोंदणी झालेली नागरिकांची संख्या

२०१७-१८ : १२ लाख १८ हजार ३३६२०१८-१९ : १९ लाख ५० हजार ८२३२०१९-२० : २८ लाख २९ हजार ७९५२०२०-२१ : ४२ लाख ७० हजार ९७

गृह, परिवहन विभाग आघाडीवर

लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत एकूण ३१ विभागांपैकी २८ विभागांनी ५०६ सेवा अधिसूचित केल्या आहेत. गृह व परिवहन विभाग (९०), उद्योग, कामगार व ऊर्जा विभाग (८०), महसूल व वनविभाग (६६), नगर विकास (५२) या चार विभागांनी जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन दिल्या आहेत.

अर्जांची स्थिती :

आपले सरकारवर २०१५ ते २०२१ दरम्यान राज्यभरातून एकूण ९ कोटी ७८ लाख ८१ हजार ८१२ अर्ज प्राप्त झाले. त्यातील ९ कोटी ४० लाख ६५ हजार ७३२ अर्जांवर कार्यवाही झाली.

पुणे जिल्हा आघाडीवर

राज्यात २०२०-२१ यावर्षी महसूल विभागनिहाय प्राप्त, मंजूर व कार्यवाही झालेल्या अर्जात सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्याची आहे. पुण्यात सर्वाधिक ३४ लाख ११ हजार १०३ अर्ज आले. ३१ लाख ९३ हजार ७९६ अर्जांवर कार्यवाही झाली. ३१ लाख ७३ हजार १८५ अर्ज मंजूर झाले.

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारीSenior Citizenज्येष्ठ नागरिकMaharashtraमहाराष्ट्रonlineऑनलाइन