Rain Update | पुणेकर उकाड्याने त्रस्त; आज पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 10:49 AM2022-04-25T10:49:31+5:302022-04-25T10:56:12+5:30

सोमवारी पुणे शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता...

punekar suffers from heat in summer chance of rain today 25 april | Rain Update | पुणेकर उकाड्याने त्रस्त; आज पावसाची शक्यता

Rain Update | पुणेकर उकाड्याने त्रस्त; आज पावसाची शक्यता

googlenewsNext

पुणे : गेले दोन दिवस असलेले ढगाळ हवामान, त्यामुळे वाढलेला उकाडा त्याचवेळी रात्रीच्या तापमानात झालेली मोठी वाढ यामुळे दिवसांबरोबर पुणेकरांना रात्रीही प्रचंड उकाडा जाणवतो आहे. त्यापासून काहीशी सुटका मिळण्याची शक्यता असून सोमवारी पुणे शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दिवस व रात्रीच्या तापमानातील फरक कमी झाल्याने अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव सध्या पुणेकर घेत आहेत.

राज्यात रविवारी सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४२.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. शनिवारी शहरात कमाल व किमान तापमान ३८.८ आणि २१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.

  • सोमवारी आकाश ढगाळ राहून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे.
  • २७ व २८ एप्रिल रोजीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Web Title: punekar suffers from heat in summer chance of rain today 25 april

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.