शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

पुणेरी पाट्या बघायला पुणेकरांची गर्दी : रविवारीही घेता येणार आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 18:45 IST

‘पुणेरी पाट्या’ म्हणजे पुणेकरांच्या तिरकस, खवचट, आणि अहंकारी वृत्तीचेच जणू द्योतक ! पुण्याच्या स्वभावाचे दर्शन घडविणा-या इरसाल, मार्मिक, कधी चिमटा तर कधी टपली मारणा-या ‘पुणेरी पाट्यां’मधल्या खोचक शब्दांचे एकेक तीर रसिकमनाचा वेध घेत होते आणि त्या बाणांमधून प्रत्येकाच्या ओठांवर हास्याच्या लकेरी उमटत होत्या.

पुणे : ‘पुणेरी पाट्या’ म्हणजे पुणेकरांच्या तिरकस, खवचट, आणि अहंकारी वृत्तीचेच जणू द्योतक ! पुण्याच्या स्वभावाचे दर्शन घडविणा-या इरसाल, मार्मिक, कधी चिमटा तर कधी टपली मारणा-या ‘पुणेरी पाट्यां’मधल्या खोचक शब्दांचे एकेक तीर रसिकमनाचा वेध घेत होते आणि त्या बाणांमधून प्रत्येकाच्या ओठांवर हास्याच्या लकेरी उमटत होत्या. निमित्त होते, यशवंतराव चव्हाण कलादालनात लोकमतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ’पुणेरी पाट्या’ प्रदर्शनाचे. ’पुणेरी पाट्या’ म्हणजे काय तर पुण्याच्या अभिमानाचा मानबिंदू. जे सांगायचे आहे ते स्पष्टपणे पण कुणालाही न दुखावता मांडणे हे ’ पुणेरी पाट्या’ च्या शैलीचे खास वैशिष्ट्य. प्रदर्शनात सायंकाळनंतरही रसिकांचा गर्दीचा ओघ सुरूच होता. उद्या ( रविवारी) देखील हे प्रदर्शन विनामूल्य सकाळी 11 ते 8 या वेळेत पाहाण्यासाठी खुले राहाणार आहे.आवर्जून या!...पुणेकरांचे स्वागत आहे.

       ‘अरे ही पाटी बघ ना, काय सॉलिड आहे रे’...ही पाटी कुठेतरी वाचली आहे’... ‘खरच हं पुणेकर असेच असतात’...अशा संवादामधून तर काहीशा शालजोडीमधल्या मारातून पुणेकर रसिक ’पुणेरी पाट्यां’ चा मनमुराद आनंद घेत होते..तर काही ज्येष्ठ मंडळी या पाट्या वाचून जुन्या ‘पुणे 30’ च्या आठवणीत हरवले होते..आजवर सोशल मीडियावर नुसत्याच पुणेरी पाट्या किंवा त्यासंबंधीचे विनोद व्हायरल केले जायचे...पण ‘पुणेरी पाट्यां’चा एकत्रितपणे आस्वाद घ्यायला मिळाल्यामुळे पुणेकरही या ’पुणेरी पाट्या’च्या विश्वात रमल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पाट्यांमधून ‘अस्सल’ पुणेरीपणाचा अनुभव रसिकांना मिळाला.

’ दाराची बेल वाजविल्यावर दार उघडायला वेळ लागतोच, घरात माणसे राहातात स्पायडरमन नाही’, ’चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते’ अशा नर्मविनोदी पाट्यांमधून पुणेकर रसिक खळखळून हसत होते. या पुणेरी पाट्या आता फारशा पाहायला मिळत नसल्यामुळे त्या संग्रही ठेवण्यासाठी काही पाट्या रसिक कँमे-यात बंदिस्त करीत होते. कुणी या प्रदर्शनात पाट्यांसमवेत सेल्फी काढताना दिसत होते...ज्येष्ठांसह तरूणाई देखील पाट्यांच्या विश्वात हरवली होती.

      ‘पुणेरी पाट्या’ प्रदर्शनाला रसिकांनी पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद दिला. या पाट्या लिहिण्याची एक वेगळी शैली असल्याने पुणेकर रसिकांनाही एका वॉलवर ‘पुणेरी पाटी’ लिहिण़्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.त्यालाही रसिकांनी उचलून धरले...शब्दांच्या गुंफणीतून ‘पुणेरी पाट्या’ लिहिण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत होता. आमदार मेधा कुलकर्णी यांनाही ‘पुणेरी पाटी’ वर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ’भाजपालाच मत द्या, दुस-या कुणाला नको’.इच्छेवरून फडके...अशी पाटी त्यांनी वॉलवर लिहिली. प्रदर्शनात सायंकाळनंतरही रसिकांचा गर्दीचा ओघ सुरूच होता. उद्या ( रविवारी) देखील हे प्रदर्शन विनामूल्य सकाळी 11 ते 8 या वेळेत पाहाण्यासाठी खुले राहाणार आहे.आवर्जून या!...पुणेकरांचे स्वागत आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लीक करा : https://www.facebook.com/lokmat/videos/1806704849396034/

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंटcultureसांस्कृतिक