पुणेकर गारठले
By Admin | Updated: December 19, 2014 23:57 IST2014-12-19T23:57:24+5:302014-12-19T23:57:24+5:30
पुण्याच्या तापमानात झालेली घट आजही कायम होती. किमान तापमान ९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे पुणेकरांना आजही हुडहुडी भरलेली होती.

पुणेकर गारठले
पुणे : पुण्याच्या तापमानात झालेली घट आजही कायम होती. किमान तापमान ९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे पुणेकरांना आजही हुडहुडी भरलेली होती. त्यामुळे सायंकाळनंतर शहराच्या विविध भागांमध्ये शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
पूर्ण नोव्हेंबर महिना आणि डिसेंबरचा पहिला आठवडा थंडीविना गेल्यानंतर पुणेकर कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा करत होते. पुण्यातील थंडीची तीव्रता गेल्या ४-५ दिवसांमध्ये अधिक तीव्र झाली. गेल्या दोन दिवसांत तर किमान तापमानाबरोबर कमाल तापमानही सरासरीच्या खाली गेले होते. आज कमाल तापमानात थोडी वाढ झाली. ते २७.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे दिवसा जाणवणारा गारवा थोडा कमी झाला होता. मात्र, रात्रीची थंडी
कायम होती. (प्रतिनिधी)