पुणेकरांनी अनुभवली कोलकाताच्या युवा कलाकारांची बहारदार मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 18:56 IST2018-01-29T18:52:22+5:302018-01-29T18:56:09+5:30
सुस्मिता चक्रवर्ती आणि संदीप भट्टाचारीजी यांच्या आश्वासक गायनातून रसिकांनी कोलकाताच्या युवा कलाकारांची बहारदार मैफल अनुभवली. गानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉमिंग आर्टस, मुंबईतर्फे आयोजित मैैफिलीतील समृद्ध गायकीचा आस्वाद पुणेकरांनी घेतला.

पुणेकरांनी अनुभवली कोलकाताच्या युवा कलाकारांची बहारदार मैफल
पुणे : सुस्मिता चक्रवर्ती आणि संदीप भट्टाचारीजी यांच्या आश्वासक गायनातून रसिकांनी कोलकाताच्या युवा कलाकारांची बहारदार मैफल अनुभवली. गानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉमिंग आर्ट्स, मुंबईतर्फे आयोजित मैैफिलीतील समृद्ध गायकीचा आस्वाद पुणेकरांनी घेतला. सुस्मिता यांनी सरस्वती वंदना व मीरेचे भजन गात वातावरण भक्तीमय केले. संदीप भट्टाचारीजी यांनी रागस्वरुप उलगडत जाणारी गायकी सादर केली.
प्रारंभी मुलतानी रागातील ‘देश गये’ ही रचना, तर ‘गगन पुरीला मोरी’ ही बंदिश सादर केली. त्यांनी गायलेल्या सोहनी रागातील ‘बेग बेग मन ललचाय’ या रचनेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मिश्र भैरवीतील ‘होरी खेल न कैसे जाऊ’ या रचनेने मैफलीचा समारोप झाला. अविनाश पाटील (तबला), संदीप मिश्रा (सारंगी), ओजस बसरगेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. याप्रसंगी गानवर्धनचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, कार्याध्यक्ष प्रसाद भडसावळे, प्रमोद जोशी, मा. कृ. पारधी आदी उपस्थित होते.
प्रियांका भडसावळे यांनी सूत्रसंचालन केले.