विश्वविजेत्या आनंदकडून प्रशिक्षण घेण्याची पुणेकरांना मिळणार संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 01:40 IST2019-02-06T01:40:03+5:302019-02-06T01:40:46+5:30
बुद्धिबळात तब्बल ५ वेळा विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या विश्वनाथन आनंदकडून प्रशिक्षण घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पीवायसी जिमखाना क्लबतर्फे येत्या १६ तसेच १७ तारखेला क्लबच्याच सभागृहात २ दिवसीय कार्यशाळेत आनंद मार्गदर्शन करणार आहे.

विश्वविजेत्या आनंदकडून प्रशिक्षण घेण्याची पुणेकरांना मिळणार संधी
पुणे : बुद्धिबळात तब्बल ५ वेळा विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या विश्वनाथन आनंदकडून प्रशिक्षण घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पीवायसी जिमखाना क्लबतर्फे येत्या १६ तसेच १७ तारखेला क्लबच्याच सभागृहात २ दिवसीय कार्यशाळेत आनंद मार्गदर्शन करणार आहे.
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखान्याचे मानद सचिव आनंद परांजपे व ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे म्हणाले, विश्वनाथन आनंदच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पुणे शहरात दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर होत असल्यामुळे येथील खेळाडूंना सुवर्णसंधी मिळणार आहे. बुद्धिबळ युगकर्ता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच येथील नवोदित खेळाडूंना अव्वल दजार्चे मार्गदर्शन मिळण्याची संधी या शिबिरात मिळणार आहे. त्याचबरोबर जागतिक स्तरावर यश मिळविताना आनंदच्या पालकांना किती कष्ट घ्यावे लागले होते हे येथील खेळाडूंच्या पालकांना जाणून घेण्याचीही संधी मिळणार आहे.
पत्रकारपरिषदेत पीवायसी हिंदू जिमखानाचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, क्लबच्या बुद्धिबळ विभागाचे सचिव तुषार
नगरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पुणे व मुंबई या ठिकाणाहुनच नव्हे तर, याशिवाय गाजियाबाद, गोवा, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नागपूर येथूनही बुद्धिबळपटू सहभागी होत आहेत. विश्वनाथन आनंद याच्याबरोबरच ग्रँडमास्टर विदित गुजराथी व ग्रँडमास्टर अभिजित कुंटेदेखील या कार्यक्रमात सहभागी असतील.