शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP : निवडणुकीमुळे खोळंबलेल्या ५११ कोटींच्या कामांना होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 08:52 IST

जिल्हा परिषदेच्या चार हजार १७६ कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे : विधानसभा निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेची कामे खोळंबली होती. मात्र, आता या कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून, जिल्ह्यात तब्बल ५११ कोटींची कामे होणार आहेत. सर्व कामांना जिल्हा परिषदेकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.दरम्यान, यामुळे जिल्हा परिषदेच्या चार हजार १७६ कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरी सुविधा, जनसुविधांच्या कामांसह अंगणवाडी, शाळा वर्गखोल्यांची दुरुस्ती त्याचबरोबर जिल्ह्यातील गावांमधील पायाभूत मूलभूत सुविधा, अशी अनेक कामे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे खोळंबली होती. मात्र, आता निवडणूक संपून मंत्रिमंडळ स्थापनेमुळे या कामांनी आता वेळ घेतला आहे. जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)ने मंजूर केलेल्या आराखड्यापैकी ५११ कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने पूर्ण क्षमतेने काम करण्यास सुरुवात केली आहे.

जिल्हा परिषदेचा चार हजार १७६ कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. यापैकी आतापर्यंत चार हजार १७२ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, तर तीन हजार ७१९ कामांची तांत्रिक मान्यतांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर १९८ कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून, तीन कामांना सुरुवात करण्याचा आदेश दिला आहे. जन सुविधा आणि नागरी सुविधांच्या सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून, जन सुविधांच्या २९९ आणि नागरी सुविधांच्या २८ कामांच्या तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या दोन प्रमुख कामांशिवाय ५३ अंगणवाडी बांधण्यासाठी पाच कोटी ९६ लाख रुपये, तर शाळांच्या दुरुस्तीसह इतर १२० कामांसाठी २८ कोटी ४३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. दरम्यान, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री अद्याप निश्चित झालेले नाहीत.

जिल्हा परिषदेची चार हजार १७२ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. काही कामांची तांत्रिक मान्यता पूर्ण झाली असून, १९८ कामांच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यापैकी तीन कामे सुरू झाली आहेत. -चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रzpजिल्हा परिषदcivic issueनागरी समस्या