शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP Election Result 2026: इंदापूर पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:31 IST

- मतदारांचा कल लक्षात घेता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उर्वरित जागाही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यास जागा आहे.

इंदापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत इंदापूरच्या मतदारांनी भरघोस मतांच्या रूपाने उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना आदरांजलीच वाहिल्याचे निकालावरून स्पष्ट दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी झालेल्या ६ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या १२ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. मतदारांचा कल लक्षात घेता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उर्वरित जागाही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यास जागा आहे.

वृत्त लिहीपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत भिगवण शेटफळगढे गटात मेघना तुकाराम बंडगर विजयी झाल्या. पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गटातून दीपक जाधव यांच्या पत्नी हर्षदा जाधव या विजयी झाल्या. माळवाडी-वडापुरी गटातून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे सुपुत्र यशराज आप्पासाहेब जगदाळे हे विजयी झाले. निमगाव केतकी-शेळगाव गटातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव यांच्या पत्नी सोनाली जाधव विजयी झाल्या. बोरी-वालचंदनगर गटातून संजय गांधी निराधार योजनेचे माजी तालुकाध्यक्ष सागर मिसाळ यांच्या पत्नी निर्मला मिसाळ विजयी झाल्या.

काटी-लाखेवाडी गटातून श्रीमंत ढोले विजयी झाले आहेत. भिगवण गणातून हेमा पद्माकर माडगे यांनी तर शेटफळगढे गणातून जितेंद्र प्रल्हाद वणवे यांनी विजय मिळवला. बिजवडी गणात दिलीप माणिक भिसे हे विजयी झाले. पळसदेव गणातून कीर्ती प्रवीणकुमार काळे विजयी झाल्या. माळवाडी गणातून कल्पना विष्णू पाटील तर वडापुरी गणातून अर्चना अजित खबाले विजयी झाल्या. बोरी गणातून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे विजयी झाले. वालचंदनगर गणातून पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. नंदकुमार सोनवणे यांच्या पत्नी अनिता सोनवणे विजयी झाल्या. निमगाव केतकी गणातून रणजित मनोज भोंग तर शेळगाव गणातून जयकुमार गोपाळ कारंडे विजयी झाले. माळवाडी गणातून कल्पना विष्णू पाटील तर वडापुरी गणातून अर्चना अजित खबाले विजयी झाल्या आहेत. लासुर्णे-सणसर गट,काटी-लाखेवाडी गट व बावडा-लुमेवाडी गटाच्या मतमोजणीची माहिती अद्याप मिळालेली नाही.

गुलालाची उधळण, कार्यकर्त्यांचा जल्लोष, पक्षांच्या जयघोषात आसमंत दुमदुमून टाकणारे निवडणुकीतील विजय अनुभवणाऱ्या इंदापूरकरांनी यंदा पहिल्यांदाच कोणत्याही जल्लोषाशिवाय शांतपणे आपले यश आपल्या दिवंगत नेत्याच्या पायाशी समर्पित करणारा हा विजय अनुभवला. विजयी उमेदवाराला खांद्यावर मिरवले गेले. त्याच्या हातात पक्षाचे ध्वजही होते. पण, विजयी उन्मादाच्या आरोळ्या नव्हत्या. केवळ ‘अजित पवार झिंदाबाद’च्या संयमी घोषणा होत्या.

इंदापूर पंचायत समितीची पूर्ण सूत्रे निर्विवादपणे अजित पवार यांच्या पक्षाच्या ताब्यात देणारा हा निकाल होता. त्याची सभा नेहमीच्या प्रथेनुसार जुन्या बाजार समितीच्या आवारात ठेवण्यात आली आहे. मात्र, तेथेही कसल्याही प्रकारचा विजयानंतरचा उन्माद नाही. या विजयानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळे, मधुकर भरणे आदी मान्यवरांनी माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांची प्रतिमा व दिवंगत शंकरराव पाटील यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, ‘टीकाटिप्पणी करणाऱ्यांना व भाषणे करणाऱ्यांना जनता महत्त्व देत नाही. ती विकासाला महत्त्व देते हे या निकालाने दाखवून दिले आहे’, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीसाठी नेमलेले सर्व अधिकारी कर्मचारी आज सकाळी आठ वाजता शासकीय गोदामात आले. पोस्टाने आलेल्या मतमोजणीस उशीर लागला. त्यानंतर गट व गणातील मतमोजणी सुरू झाली. मात्र, सकाळी दहा वाजल्यापासून सुमारे दोन ते अडीच तास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल घोषित केला नाही. त्यानंतर संपूर्ण वेळ मतमोजणी झालेल्या गट व गणांतील उमेदवार व त्यांना मिळालेली मते घोषित करणे, आधीच्या गट व गणाच्या मतमोजणीसाठी आलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची गर्दी कमी करणे, यातच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळ दवडला. त्यामुळे उपस्थित वार्ताहरांना शेवटपर्यंत निकालाची व्यवस्थित माहिती मिळू शकली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP Dominates Indapur Panchayat Samiti in Pune ZP Election 2026

Web Summary : In Indapur ZP elections, NCP secured victory on most seats, honoring Ajit Pawar. Celebrations were muted, victory dedicated to the late leader. Dattatraya Bharne emphasized development's importance.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Puneपुणे