शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

पुण्यात महिला पोलीस अधिका-याला अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 19:46 IST

महिला पोलीस अधिका-याला पुणे नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाक्यावरील अधिकारी व कर्मचा-यांनी अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या  अनुषंगाने कारवाई करण्यासाठी जात असलेल्या पुणे युनिटच्या महिला पोलीस अधिका-याला पुणे नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाक्यावरील अधिकारी व कर्मचा-यांनी अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी टोलनाक्यावरील अधिकारी व कर्मचा-यांवर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकारी संजय लोणे, आनंद , प्रदीप देशमुख, आणि कर्मचारी पांडुरंग रणदिवे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपअधीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलीस व पंच असे शासकीय गोपनीय कामासाठी आळेफाटा येथे जात असताना जुन्नर येथील मौजे चाळकवाडी टोलनाक्याच्या बुथवर त्यांनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून शासकीय कामासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र बुथवरील कर्मचा-याने पोलिसांचे ओळखपत्र चालत नाही असे सांगितले. शासकीय कामासाठी चाललो असल्याचे सांगूनही कर्मचा-याने अधिकारी व पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

अधिका-यांनी टोलनाक्यावरील कर्मचा-यास व्यवस्थित बोलण्यास आणि वागण्यास सांगितले असता त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यावरून त्यांच्यात झटापट झाली. पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड केली. शासकीय कामामध्ये अडथळा आणून महिला पोलीस अधिका-यास अश्लिल व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करून हल्ला केल्याप्रकरणी टोलनाक्यावरील अधिकारी आणि कर्मचा-यांविरूद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हाPuneपुणे