शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पुण्याला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या १२० जवानांची एक तुकडी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 20:09 IST

लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आणि आगामी रमजान ईद सण जवळ आल्याने पोलिसांच्या मदतीसाठी १२० जवानांची एक तुकडी पुण्यात

ठळक मुद्देराज्यात एक हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोना विषाणुची लागणगेल्या २ महिन्यांपासून लॉकडाऊन काळात पोलीस दल मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तात

 

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व येणारा रमजान सण लक्षात घेऊन शहर पोलीस दलाच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची १२० जवानांची एक कंपनी पुणे शहरात येणार आहे.गेल्या २ महिन्यांपासून लॉकडाऊन काळात पोलीस दल मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तात अडकलेले आहे. राज्यात एक हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे.त्यामुळे मोठ्या संख्येने पोलिसांना क्वारंटाईन करावे लागले आहे. तसेच ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचार्‍यांना खबरदारी म्हणून रजा देण्यात आली आहे. त्यामुळे उरलेल्या पोलीस दलावर बंदोबस्ताचा मोठा ताण आला आहे. सलग दोन महिन्यांच्या बंदोबस्तामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांची दमवणूक झाली आहे. लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आणि आगामी रमजान ईद सण जवळ आल्याने पोलिसांच्या मदतीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय सशस्त्र दलाच्या २० कंपन्यांची मागणी केंद्राकडे केली आहे.या कंपन्या आल्यानंतर मुंबईवर राज्यातील विविध शहरांमध्ये त्या तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र दलाच्या १२० जवानांची तुकडी पुणे शहराला मिळणार आहे. पुणे शहरात ६९ ठिकाणी प्रतिबंधितक्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी पुणे पोलिसांना ही तुकडी बंदोबस्तासाठी सहाय्य करेल, असे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टेयांनी सांगितले.पुणे शहरात आतापर्यंत १७ पोलीस कर्मचार्‍यांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे. त्यामुळे जवळपास १७५ हून अधिक पोलिसांना क्वारंटाईन करावे लागले आहे. तसेच पुण्यातील ५५ वर्षांवरील कर्मचारी व आजारी कर्मचार्‍यांना रजा देण्यात आली आहे. त्यामुळे उरलेल्या पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण आला आहे. त्यामुळे कंटेंमेंट झोन व्यतिरिक्त शहराच्या इतर भागातील बंदोबस्तआता शिथिल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारAmit Shahअमित शहाAnil Deshmukhअनिल देशमुखState Governmentराज्य सरकारPoliceपोलिसRamzan Eidरमजान ईद