शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

पुणेकरांना मराठीमध्ये नक्की ऐकविणार -कौशिकी चक्रवर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 3:07 AM

महाराष्ट्रामध्ये अभिजात संगीताचे सादरीकरण करणे ही एक पर्वणी असते. पुणेकरांचे शास्त्रीय संगीताचे कान इतके तयार आहेत, की त्यांच्यासमोर मैफल सादर करताना जबाबदारी वाढते.

पुणे - महाराष्ट्रामध्ये अभिजात संगीताचे सादरीकरण करणे ही एक पर्वणी असते. पुणेकरांचे शास्त्रीय संगीताचे कान इतके तयार आहेत, की त्यांच्यासमोर मैफल सादर करताना जबाबदारी वाढते. पुण्यातील दर्दी रसिकांकडून हे प्रेम आणि आशीर्वाद मिळतात. संपल्यावर एखादा रसिक प्रेमाने मराठीमध्ये बोलायला लागतो तेव्हा आपुलकी दिसून येते. त्यांच्या कुटुंबाचाच एक सदस्य असल्यासारखे वाटते. ही गोष्ट फक्त संगीतामुळे शक्य झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना ‘मराठी’मध्ये नक्कीच काहीतरी ऐकविणार असल्याचे भावना प्रसिद्ध युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी सांगितले.युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि फिनोलेक्स पाइप्स व पीएनजी ज्वेलर्स याच्या सहयोगाने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ रंगणार आहे. कौशिकी चक्रवर्ती यांची स्वरमैफल रंगणार आहे. या सुरांनी पहाट द्विगुणित होणार आहे.कलाकारांना पुण्यातील रसिकांकडून एवढे प्रेम मिळते. येथे वेगळे काय देता येईल, याचाच विचार करावा लागतो. महाराष्ट्रीयन वादकदेखील इतके उत्कृष्ट आहेत, की त्यांच्यासमवेत मैफल करताना आपणही महाराष्ट्रीयनच असल्यासारखे वाटते. उस्ताद बडे गुलामअली खाँ यांना पतियाला घराण्याचे भगवान मानतो. या घराण्याचा पाया त्यांनी रचला. त्यांची गायकी हीच या घराण्याची खासियत आहे. त्यांचा आवाज लावण्याबरोबरच सादरीकरणाची पद्धत अत्यंत वेगळी आहे. त्यांचे सादरीकरण इतके अनिश्चित असायचे, असे गायकीमध्ये अशा जागा घेऊन ते काहीतरी वेगळेच देऊन जायचे. शास्त्रीय संगीताकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूपच आधुनिक होता. दिवाळी पहाट ही कलाकारांसाठी प्रात:समयीचे राग सादर करण्याची एक संधी असते. दिवाळी पहाटमध्ये सकाळच्या प्रहरातील राग ऐकवता येणे शक्य आहे. सकाळचे वातावरण अत्यंत शुद्ध असते.- कौशिकी चक्रवर्तीदिवाळीचे स्वागत सुरांच्या मैफलीने करण्याचा ‘लोकमत’चा उपक्रम कौतुकास्पद आहे. दिग्गज गायकांच्या मैफलीने दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल. पुणेकर दिवाळी पहाटच्या सूर व संगीत मैफलीत रममाण होईल. आनंददायी, उत्साही, मनावरील ताणतणाव, मरगळ दूर करील, नवा उत्साह, उमेद देण्याचे काम करेल.- युवराज ढमाले, अध्यक्ष, युवराज ढमाले कॉर्प‘लोकमत’ने दिवाळी पहाटची अनोखी परंपरा सुरू केली आहे. यामध्ये शास्त्रीय संगीताला प्राधान्य देऊन दर्दी आणि रसिक पुणेकरांना एक आगळीवेगळी मेजवानीच दिली आहे. ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ ही पुण्याच्या सांस्कृतिक वैभवातील सोनेरी मुकुट बनला आहे. - सौरभ गाडगीळ, अध्यक्ष, पीएनजी ज्वेलर्सदिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव, दिव्यांचा उत्सव, फटाक्यांचा उत्सव. याच दिवाळीची रंगत ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ने आणखी वाढणार आहे. संगीत आणि सुरांच्या मिलाफाने रसिकांची पहाट स्मरणदायी होईल. मनावरील मळभ दूर सारून हे सूर नवीन उमेद देण्याचे काम करतील.- प्रकाश छाब्रिया, अध्यक्ष, फिनोलेक्स इंडस्ट्रीजकार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्धलोकमत कार्यालय : व्हीया वेंटेज बिल्डिंग, लॉ कॉलेज रोड, वडगाव कार्यालय : वडगाव खुर्द, सिंहगड रोड, हडपसर कार्यालय : मेगा सेंटर, हडपसर, पीएनजी ज्वेलर्स : ६९४, लक्ष्मी रोड, कुंटे चौक, नारायण पेठ, पौड रोड : कॉमर्स वेन्यू, पौड रोड, आयडियल कॉलनी, कोथरूड, एमजी रोड : अपोजिट हनुमान टेम्पल, कॅम्प, औंध : सुप्रीम सेंटर, आयटीआय रोड, लोकमान्य मल्टिपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटी, शाखा : डहाणूकर कॉलनी, सेनापती बापट रस्ता, रसिक साहित्य : अप्पा बळवंत चौक, बालगंधर्व रंगमंदिर, भरतनाट्य मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, काका हलवाई स्वीट सेंटर : आयुर्वेदिक रसशाळेसमोर, कर्वे रोड, शॉप नं. २, चित्रलेखा अपार्टमेंट, आयडियल कॉलनी,पौड रोड, शॉप नं. १, अलंकार पोलीस चौकी, नवसह्याद्री, अभिनव कला महाविद्यालयजवळ, टिळक रोड, खत्री बंधू पॉट आईस्क्रिम व मस्तानी : विठ्ठल मंदिर कॉर्नर, कर्वेनगर, गंगाधाम भाग्योदय अपार्टमेंट, सिंहगड रोड, शिवाजी पुतळा चौक, कोथरूड, शॉप नं. ६, वनाज कॉर्नर, पौड रोड, लोकमान्य कॉलनी, किनारा हॉटेलजवळ. ऊर्जा : बालकृष्णा एंटरप्रायझेस, काळभैरवनाथ मंदिराजवळ, धायरी, समर्थ एंटरप्रायझेस, स्वीट होम हॉटेलसमोर, कुमठेकर रोड, सदाशिव पेठ, थोरात डेअरी, संगीता हॉटेल चौक, गुजरात कॉलनी, कोथरूड

टॅग्स :Puneपुणेmarathiमराठी