शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

खडकवासला प्रकल्पात पाण्याची आवक सुरू, ५.७४ टीएमसी पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 09:42 IST

यंदा पूर्वमोसमी तसेच मॉन्सून लवकर आल्याने पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या चारही धरणांमध्ये एकूण ५.७४ टीएमसी पाणीसाठा आहे.

पुणे : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये अल्प वाढ झाली आहे. दरवर्षी साधारणत: जुलैमध्ये पाणी साठण्यास सुरुवात होते. यंदा पूर्वमोसमी तसेच मॉन्सून लवकर आल्याने पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या चारही धरणांमध्ये एकूण ५.७४ टीएमसी पाणीसाठा आहे.

खडकवासला धरण प्रकल्पातील टेमघर, पानशेत, वरसगाव व खडकवासला ही धरणे मागील वर्षी १०० टक्के भरली होती. यंदा मात्र, मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढल्याने शहरात पाण्याची मागणी वाढली होती. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पूर्वमोसमी पावसाने शहरात, तसेच घाटमाथ्यावर हजेरी लावली. त्यातच गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी धरणसाठ्यात वाढ दिसून आली आहे. खडकवासला धरणात मंगळवारी २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात ०.९८ टीएमसी पाणीसाठा असून, हे प्रमाण ४९.४२ टक्के इतके आहे.

धरणात ४८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. पानशेत धरणात मंगळवारी २५ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात सध्या १.९० टीएमसी (१७.८४ टक्के) पाणीसाठा आहे. वारसगाव धरणात १७ मिलिमीटर पाऊस झाला असून, एकूण साठा २.७२ टीएमसी (२१.२४ टक्के) आहे. धरणात २६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. टेमघर धरणात १५ मिलिमीटर पाऊस झाला असून ०.१४ टीएमसी (३.८८ टक्के) पाणीसाठा आहे. दिवसभरात चारही धरणांमध्ये एकूण ५ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. सध्या या चार धरणांमध्ये एकूण ५.७४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे, जो एकूण क्षमतेच्या १९.७० टक्के आहे. गेल्यावर्षी याच तारखेला हा साठा १९.५९ टक्के होता.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी