शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

Pune Water Cut | उपनगरांसह संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 09:36 IST

या सर्व भागाला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे....

पुणे : महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस. एन. डी. टी. वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग, भामा-आसखेड जलशुद्धीकरण येथील विद्युत, पंपिंगविषयक आणि स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. २७) रोजी उपनगरांसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या सर्व भागाला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे - शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वेरस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मीठानगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं. ४२-४६ (कोंढवा खुर्द), पर्वती टँकर भरणा केंद्र,पद्मावती टँकर भरणा केंद्र, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी,

आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, चांदणी चौक, किष्किंधा नगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर,वारजे-माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुलनगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसर,

लष्कर भाग, पुणे स्थानक, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगररस्ता आणि परिसरातील सर्व समाविष्ट गावे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे