शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठाने शासनाच्या आदेशाची वाट न पाहता निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:14 IST

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार राज्यातील विद्यापीठांच्या विविध अधिकार मंडळाच्या निवडणुका घेण्यास अडचणी येत असून, सुमारे दोन वर्षापासून विद्यापीठाचा काराभार केवळ विद्यापीठाच्या अधिका-यांकडूनच चालविला जात आहे. परिणामी विद्यापीठाची अधिसभा आता नावापुरतीच राहिली आहे. त्यामुळे...

पुणे - नवीन विद्यापीठ कायद्यानुसार राज्यातील विद्यापीठांच्या विविध अधिकार मंडळाच्या निवडणुका घेण्यास अडचणी येत असून, सुमारे दोन वर्षापासून विद्यापीठाचा काराभार केवळ विद्यापीठाच्या अधिका-यांकडूनच चालविला जात आहे. परिणामी विद्यापीठाची अधिसभा आता नावापुरतीच राहिली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शासनाच्या आदेशाची वाट न पाहता निवडणूक कार्यक्रम तात्काळ जाहीर करावा,अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून केली जात आहे.राज्य शासनाने २०१५ मध्ये जुन्या विद्यापीठ कायद्यानुसार निवडून आलेल्या सदस्यांची अधिकार मंडळे मुदत संपल्यानंतर बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुलगुरूंनी नियुक्त केलेल्या प्रभारी अधिष्ठात्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. विद्यापीठाच्या अधिसेभेची बैठक येत्या ७ आॅक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, गेल्या पाच अधिसभांच्या बैठकांना विद्यापीठाचे कुलगुरू ,कुलसचिव, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक, वित्त व लेखा अधिकारी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक किंवा सहसंचालक आदी पदसिध्द सदस्य वगळता शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणारा एकही प्रतिनिधी विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षण वर्तुळात संतापाचे वातावरण आहे.नवीन विद्यापीठ कायदा विद्यार्थी केंद्रीत असल्याचे सत्ताधा-यांकडून सांगितले जात आहे. मात्र, विद्यापीठ कायद्याच्या अंमलबजावणीस घाई केल्यामुळे विद्यापीठाची घडी विस्कटत चालली आहे. त्यातच विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून जाणा-या सदस्यांसाठी आरक्षणाचे नियम पाळले जाणार आहेत का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया थंडावली आहे.विद्यापीठाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून सुमारे 49 हजार पदवीधर मतदार 10 पदवीधरांना अधिसभेवर निवडून देणार आहेत. शिक्षक मतदारांची नोंदणी पूर्ण होत आली असून 8 हजार मतदार आपले प्रतिनिधी निवडून देतील. संस्था चालकांच्या सुमारे 220 प्रतिनिधीमधून काही संस्थाचालक विविध अधिकार मंडळावर निवडून जाणार आहेत. विद्यापीठाच्या निवडणुका रखडल्यामुळे विद्यापीठाचा सुमारे ७०० ते ८०० कोटी रुपयांचा अर्थ संकल्प सहा ते सात सदस्यांकडून मंजूर केला जात आहे. शैक्षणिकदृष्ट्या ही चांगली बाब नाही. त्यामुळे कुलगुरूंनी पुढाकार घेवून निवडणूक कार्यक्रम तयार करून त्यानुसार सर्व अधिकार मंडळाच्या निवडणुका घेण्यास सूरूवात करावी.- डॉ.गजानन एकबोटे,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ राज्यातील काही विद्यापीठांच; निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले आहेत.त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुध्दा आपला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची गरज आहे. अधिसभेतील केवळ पाच ते सहा सदस्यांनी शिक्षण व्यवस्थेवर,तरुणाईवर,शिक्षक व संस्थाचालकांवर परिणाम करणारे निर्णय घेऊ नयेत.- प्रा.नंदकुमार निकम,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणेElectionनिवडणूक