पुणे - गरवारे महाविद्यालयाच्या परिसरात आज सकाळी अचानक वाऱ्याच्या जोरामुळे एक मोठं काटेरी झाड कोसळलं. या दुर्घटनेमुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, काही नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झाड कोसळण्याच्या ठिकाणी गरवारे महाविद्यालयासोबतच एक रुग्णालय आणि खाऊ गल्ली असल्याने तेथे नेहमीच मोठी वर्दळ असते. झाड कोसळल्यामुळे काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांना नुकसान पोहोचले आहे.
गरवारे महाविद्यालयाजवळ झाड कोसळले; वाहतूक कोंडी, काही नागरिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:52 IST