शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुक पाेलिसांच्या कारवाईचा धडाका, पीएमपी, एसटी बसलासुद्धा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 21:19 IST

स्वारगेट येथील जेधे चाैकात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई करण्यात अाली अाहे.

पुणेस्वारगेट येथील जेधे चाैकात हाेणाऱ्या वाहतूककाेंडीच्या पार्श्वभूमिवर वाहतुक विभागाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली अाहे. साेमवारी या चाैकातील वाहतुकीस अडथळा हाेईल अशा प्रकारे थांबलेल्या रिक्षा, माेटारी, खासगी प्रवासी बस यांच्यासह पीएमपी अाणि एसटी बसेसवर कारवाई करण्यात अाली. या कारवाईतून 50 हजारांचा दंड वसूल करण्यात अाला. 

    पाेलिस अायुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांनी पदभार स्विकारल्यानंतरच वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले हाेते. शहरातील सर्व वाहतुक विभागाकडून नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येत अाहे. पीएमपी बस रस्त्यावर बंद पडत असल्यामुळे वाहतुक काेंडी हाेत असते. या बंद बडलेल्या बसेसवरदेखील कारवाई करण्याचे अादेश अायुक्तांनी दिले अाहेत. स्वारगेट हे शहरातील महत्त्वाचे ठिकाण असून त्या ठिकाणी माेठ्याप्रमाणावर वाहतूक तसेच नागरिकांची ये जा असते. या ठिकाणी कशाही पद्धतीने लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम हाेत असताे. त्यामुळे स्वारगेट वाहतुक विभागाने मागील काही दिवसांपासून बेशिस्त वाहनचालकांवर आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा वाहनांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी स्वारगेट परिसरात जवळपास 50 रिक्षांवर कारवाई केल्यानंतर वाहतुक शाखेने सोमवारीदेखील अशीच कारवाई केली.        स्वारगेट वाहतुक शाखेने सोमवारी बेशिस्तपणे रस्त्यावर किंवा रस्त्यालगत लावलेल्या सुमारे 35 रिक्षांवर कारवाई केली. तसेच, छत्रपती शाहू बसस्थानकासमोर क्रमाने लावलेल्या चार पीएमपीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे त्यांच्यावर आणि जेधे चौकात बंद पडलेल्या दोन पीएमपी बसवर कारवाई केली. त्यासह बंद पडलेल्या एसटीमुळे वाहतुक कोेंडी झाल्यामुळे त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली. स्वारगेट परिसरातून परवानगी नसतानादेखील जाणाऱ्या 2 अवजड वाहनांसह 5 खासगी प्रवासी बसवर कारवाई केली. तसेच, सुमारे 30 दुचाकी वाहनांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारवायांमधून सुमारे 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती स्वारगेट वाहतुक विभागाचे पोलिस निरिक्षक संपतराव भोसले यांनी दिली. जेधे चौक आणि परिसरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी येत्या काळात अशाच प्रकारे कठोर कारवाई करणार असल्याचेही भोसले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसSwargateस्वारगेट