शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनो, दारू पिऊन गाडी चालवण्याचा विचारही नको, पोलिसांनी अशी केलीये तयारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 14:40 IST

नववर्षांच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन गाडी चालवण्याचा विचारही पुणेकरांनी करू नये इतकी कडक व्यवस्था पुणे पोलिसांनी केली आहे

पुणे : नववर्षांच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन गाडी चालवण्याचा विचारही पुणेकरांनी करू नये इतकी कडक व्यवस्था पुणे पोलिसांनी केली आहे. त्यामुळे दारू पिऊन स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी मोहीम सुरु केली आहे. आज सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेली ही मोहीम उद्या अर्थात १ जानेवारीच्या सकाळपर्यंत सुरु राहणार आहे.            याबाबत पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, यंदा नववर्षाचे स्वागत करताना गुन्हे थोपवण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी संपूर्ण शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेतला जाणार आहे. या कॅमेऱ्यामध्ये सुमारे १५ दिवसांचे रेकॉर्डिंग साठवले जाणार आहे. त्यामुळे संबंधित व्हिडीओ बघून गाडीचालकांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय शहरात ठिकठिकाणी पोलीस पथक वाहनचालकांची तपासणी करणार आहेत. त्यासाठी यंदा अद्ययावत श्वास तपासणी यंत्र वापरले जाणार आहे. यावेळी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून गाडी ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मद्य प्राशन करून किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल असे वर्तन करू नये असे आवाहन त्यांनी केले. आगामी वर्षात ध्वनी प्रदूषण व गंभीर अपघात रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारी