शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Pune Traffic: प्राणप्रतिष्ठापना सोहळा, गणेशमूर्ती खरेदीनिमित्त वाहतुकीत मोठा बदल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 10:39 IST

Pune Traffic Advisory News: डेंगळे पूल, मध्य भागातील छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग, मुंढव्यातील केशवनगर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

पुणे : प्राणप्रतिष्ठापना सोहळा, तसेच शिवाजीनगर भागातील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. डेंगळे पूल, मध्य भागातील छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग, मुंढव्यातील केशवनगर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

शिवाजीनगर येथील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती विक्रेत्यांनी स्टाॅल थाटले आहेत. या भागातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (दि. २६) आणि बुधवारी (दि. २७) बदल करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते मंडईतील गोटीराम भैय्या चौक हा मार्ग वाहतुकीस बंद असणार आहे. वाहनांनी संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक या मार्गाने जावे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौक, खुडे चौकमार्गे कुंभारवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी पुलावरून डावीकडे वळून संताजी घोरपडे मार्गाने कुंभारवेसकडे जावे. सारसबाग परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते समाधन भेळ सेंटर 

(सिंहगड रोड) परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, नीलायम चित्रपटगृहाजवळ वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बुधवारी (दि. २७) मध्य भागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. कसबा पेठेतील फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक, मंगला चित्रपटगृहसमोरील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मुंढव्यातील केशवनगर परिसरात मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २६) या भागात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने जाणार आहे.पीएमपी बस मार्गात बदल...

शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस मार्गात बदल करण्यात आला आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता,डेक्कन जिमखाना, टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जातील. महापालिका भवन परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.मूर्ती खरेदीसाठी पार्किंग व्यवस्था...

- कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा

- कामगार पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा

- संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा

- टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्रातील रस्ता

- मंडईतील वाहनतळ

- छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक

उत्सवाच्या काळात मध्य भागात येणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा. शक्यतो कार मध्य भागात आणू नयेत. विसर्जन मिरवणुकीनिमित्त वाहनचालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. उत्सवाच्या काळात मध्यभागात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. - हिंमत जाधव, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडी