शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

Pune: सातारा रस्ता बीआरटी मार्गात बर्निंग कारचा थरार; चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 23:47 IST

Pune: पुणे सातारा रस्ता बीआरटी मार्गावरील पद्मावती बस स्थानका जवळ शनिवारी (दि. १२) सायंकाळी आठच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. चालत्या मोटारीने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात मोटार जळून खाक खाली.

- पांडुरंग मरगजेधनकवडी - पुणे सातारा रस्ता बीआरटी मार्गावरील पद्मावती बस स्थानका जवळ शनिवारी (दि. १२) सायंकाळी आठच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. चालत्या मोटारीने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात मोटार जळून खाक खाली. सुदैवाने मोटारीतून प्रवास करणारे पती-पत्नी दोघे हि सुखरूप असून त्यांना कुठलीही इजा झाली नाही विनायक लिलाधर जाखोटीया, (वय ३० वर्षे,) व पत्नी अवनी जाखोटीया ( रा. मुरमाड, कल्याण ) अशी गाडीतून प्रवास करणाऱ्या पती पत्नी ची नावे होत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्विप्ट डिजेल एमएच ०५, डीएच ५५३१ या क्रमांकाची पुणे सातारा रस्ता मार्गे कल्याणच्या दिशेने चाललेली मोटार पद्मावती जवळ पोहचली असता या मोटारी मधून वास येत असल्याची बाब मोटार चालकाच्या लक्षात आली त्याने समयसुचकता आणि प्रसंगाव धान राखत मोटार बाजूला घेत स्वतः सह पत्नी ला खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली.

मोटारीतील दोघेही खाली उतरताच मोटारीने मोठा पेट घेतला. बघता-बघता मोटार जळून खाक झाली दरम्यान पोलिसांनी पाचारण केलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ आग विझवली, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने मोटाररस्त्या च्या बाजूला करून घेत वाहतूक पूर्ववत केली. या आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. आगीचे आणि धुराचे मोठाले लोळ परिसरात पसरले होते तर बघ्यांच्याही मोठी गर्दी झाली होती.

 रक्षाबंधन ठरले जीवनरक्षकरक्षाबंधनाचा धागा नाजूक रेशमाचा असला तरी त्यामध्ये जीवन रक्षणाचे सामर्थ्य असते. भावाने बहिणीचे रक्षण करावे म्हणून बांधला जाणारा हा रेशीमबंध प्रसंगी भावाचेसुद्धा प्राणरक्षण करू शकतो, याचा प्रत्यय नुकताच आला. कल्याण येथील रहिवासी विनायक लिलाधर जाखोटीया हे व्यवसायिक असून त्यांच्या पत्नी अवनी सह ते कल्याणवरुन पुण्यातील मार्केट यार्ड येथील गंगाधाम येथे राहणारी आपली बहिण श्रुती विजय भट्टड यांच्याकडे रक्षाबंधनाच्या निमि त्ताने राखी बांधण्यासाठी आले होते कारण त्यांना रक्षाबंधन सणाला कामामुळे पुन्हा येणे शक्य नव्हते. म्हणून ते बहिणीच्या हातून राखी बांधून सायंकाळी कल्याणला परत जात असताना अचानक त्यांच्या चारचाकी गाडीने पेट घेतला. प्रसंगावधान राखत ते व त्यांच्या पत्नी वेळीच गाडीतून बाहेर पडल्याने दोघेही बचावले परंतु गाडी मात्र जळून खाक झाली. जोखोटिया कुटुंब बालंबाल बचावले, विनायक जखोटीया म्हणाले, बहिणी ने प्रेमाने बांधलेल्या धागेतील ताकद मला आज जीवनदान देऊन गेली. 

टॅग्स :Puneपुणेfireआग