शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण पुण्यावरची पाणीकपात अखेर दुसऱ्या दिवशीच पालिका प्रशासनाने घेतली मागे

By राजू हिंगे | Updated: May 6, 2025 20:41 IST

पुणे : दक्षिण पुण्यावर आठवड्यातून एक दिवस लादण्यात आलेली पाणीकपात अखेर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने मागे घेतली आहे. बुधवारपासून या ...

पुणे : दक्षिण पुण्यावर आठवड्यातून एक दिवस लादण्यात आलेली पाणीकपात अखेर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने मागे घेतली आहे. बुधवारपासून या परिसरात नियमित पाणीपुरवठा होणार आहे. पाणीकपातीला नागरिकांकडून तसेच राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाल्याने धरणे शंभर टक्के भरली होती. आताही पुरेसा पाणीसाठा असतानाही केवळ नियोजनाचा अभाव आणि वितरणातील त्रुटींमुळे दक्षिण पुण्यात पाणीकपात लागू केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांकडून पाणीकपातीस विरोध होत आहे. एक दिवस पाणी बंद ठेवण्यात आल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम जाणवतो. त्यामुळे पाणीकपातीला विरोध होत होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव तापकीर यांनीही हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. वडगाव जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या सिंहगड रस्ता व सातारा रस्त्यावरील भागात चक्राकार पद्धतीने आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सोमवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती.

धायरी, सनसिटी, वडगाव बुद्रुक, हिंगणे, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर, कात्रज, कोंढवा बुद्रुक आदी परिसरामध्ये हा निर्णय लागू होता. पाणीकपातीनंतर दक्षिण पुण्यातील काही भागातून तक्रारी आल्या होत्या. पाणीकपातीला विरोध होत होता. त्यानंतर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करून उपलब्ध पाणीसाठा आणि पावसाळ्याचा कालावधी यासह परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater shortageपाणीकपात